धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 33591
बोरकुंड (ता. धुळे) : इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये झालेल्या सिकल सेल ॲनिमिया जनजागृती व तपासणी शिबिरात तपासणी करताना विद्यार्थी.
--
बोरकुंडला सिकल सेल जनजागृती शिबिर
--
कॉलेज ऑफ फार्मसीचा उपक्रम; आरोग्यविषयक मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांमध्ये सिकल सेल ॲनिमियाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने विशेष सिकल सेल ॲनिमिया जनजागृती व तपासणी शिबिर नुकतेच झाले. आरोग्य विभागाच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून सिकल सेलबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कॉलेज ऑफ फार्मसीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी भदाणे, प्राचार्य डॉ. आर. ए. अहिरराव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे विलास वारुळे, दौलत मोरे, कांतीलाल चौहान, सार्वजनिक आरोग्य विभागाचे विशाल पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे योगेश खैरनार व दिनकर वळवी आदी उपस्थित होते. शिबिरादरम्यान सिकल सेल ॲनिमियाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सिकल सेल हा आनुवंशिक रक्तविकार असून, त्याचे वेळीच निदान झाल्यास योग्य वैद्यकीय सल्ला, नियमित देखरेख आणि आवश्यक उपचारांच्या माध्यमातून आरोग्यविषयक गुंतागुंत कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आजाराविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेऊन स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती मिळण्यासह सिकल सेलची तपासणी करण्यात आली. अंतिम वर्ष बी. फार्मसीचे जयश्री देवरे, हर्षदा चव्हाण, हर्षल राजपूत यांनी सहकार्य केले. प्रा. तृणाल आर. सोनवणे यांच्यासह शिक्षकांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.