नाशिक

सिकलसेल व थॅलेसेमिया नियंत्रणासाठी माडा शिष्टमंडळाचा अभ्यासदौरा

CD
(पान १ ला ॲंकर) फोटो : NSK26H33848 चंद्रपूर : येथील सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट ॲन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीज या संशोधन केंद्राच्या भेटीप्रसंगी उपस्थित ‘माडा’ संस्थेचे सदस्य. ----------------- सिकलसेल, थॅलेसेमिया नियंत्रणासाठी अभ्यासदौरा आदिवासी समाजातील समस्येला प्रभावीपणे हाताळण्यासाठी ‘माडा’ शिष्टमंडळाचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २९ : ‘सिकलसेल’ व ‘थॅलेसेमिया’ नियंत्रणासाठी ‘माडा’ शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यासदौरा नुकताच केला. या वेळी चंद्रपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद संचलित सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट ॲन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीज या संशोधन केंद्राला भेट देण्यात आली. भेटीदरम्यान सिकलसेल आणि थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकारांचे निदान, प्रतिबंध, उपचार आणि नियंत्रण यासंदर्भातील संशोधनकार्याची माहिती शिष्टमंडळाने जाणून घेतली. नंदुरबारसह लगतच्या राज्यांमध्ये तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सिकलसेल व थॅलेसेमिया या रक्तविकारांची समस्या गंभीर बनत आहे. विशेषतः आदिवासीबहुल भागांमध्ये सिकलसेल आजाराचे वेळीच निदान, जनजागृती, समुपदेशन, योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन करून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्था सतत कार्यरत असते. आदिवासी व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे आणि सिकलसेलसारख्या अनुवंशिक रक्तविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी संशोधन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे. संघटनेचे सदस्य सिकलसेल नियंत्रण आणि जनजागृतीच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिष्टमंडळात डॉ. राजेश वळवी, डॉ. प्रकाश पाडवी, डॉ. योगेश वळवी, डॉ. सुनील वळवी, डॉ. संजीव वळवी आणि डॉ. जयदीप वळवी यांचा समावेश होता. ------ आजाराचे स्वरूप सखोलपणे समजणार भेटीदरम्यान शिष्टमंडळाने संशोधनकार्य, रोगनिदान प्रक्रिया, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रुग्णसेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. रेणवीय (मॉलिक्युलर) संशोधन व डीएनएच्या अभ्यासातून सिकलसेल आजाराचे स्वरूप अधिक सखोलपणे समजून घेणे आणि रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे याविषयी माहिती जाणून घेतली. आदिवासी समाजातील सिकलसेल समस्येला अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी ‘माडा’ला या दौऱ्यातून नवी दिशा मिळाली. माडामार्फत सुरू असलेल्या सिकलसेलविषयक कामाला या भेटीमुळे गती मिळणार आहे.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

डॉक्टरांना घरी पाठवूया? आधी काव्याची कॉलेजमध्ये, आता सायलीची 'या' ठिकाणी होणार डिलिव्हरी; 'ठरलं तर मग'च्या ट्विस्टवर चाहते नाराज

Latest Marathi News Update: नाशिकच्या एसीबी पथकाचा मालेगावात छापा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

SCROLL FOR NEXT