NMC election Latest marathi news esakal
नाशिक

NMC Election : प्रभागरचना बदलण्याचे संकेत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) महापालिका निवडणुकीसंदर्भात (NMC election) दोन महत्त्वाच्या चुका केल्या आहेत.

या दोन्ही चुकांमध्ये सुधारणा करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती बुधवारी (ता. २७) देत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना बदलणार असल्याचे संकेत दिले. (Signals to change ward structure Information of Chandrashekhar Bawankule NMC Election latest Marathi news)

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित होत्या. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका थांबल्या, तर दुसरीकडे राज्य सरकारने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली.

नियमानुसार प्रभागरचना करता येत नाही. तसेच जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत नगरसेवकांची संख्याही वाढवता येत नाही. मात्र या सरकारने या दोन्हीसंदर्भात चुका केल्या. जनगणना झाली नसताना वाढीव संख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली, तर न्यायालयाने प्रभागरचनेत बदल न करण्याच्या सूचना दिल्यानंतरही राज्य सरकारने त्याप्रमाणे बदल केले नाहीत.

त्यामुळे या दोन्ही चुका दुरुस्त करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती श्री. बावनकुळे यांनी दिली. विविध कार्यक्रमांसाठी ते नाशिकमध्ये आले होते.

बहुसदस्यीय प्रभागरचना हवी

प्रभागरचना करताना नगरसेवकांची संख्या किती असावी, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसदस्य अर्थात, चार सदस्यांचा प्रभाग करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आल्याची माहिती श्री. बावनकुळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 पहिल्यांदाच मिळतोय इतका स्वस्त; हजारो रुपयांचा डिस्काउंट, iPhone 16 अन् MacBook वरही जबरदस्त सूट..'इथे' सुरुय ऑफर

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये भाजपला धक्का? शिवसेना-राष्ट्रवादीत ७०-५० चा फॉर्म्युला ठरला!

खाकी वर्दीला सलाम! दारुच्या नशेत पती गर्भवती पत्नीला नेत होता रुग्णालयात, पोलिसांनी अडवलं अन्... पाहा VIDEO

'आईवडील सतत भांडण करायचे' बिग बॉस फेम मालती चहरने सांगितला जुना किस्सा, म्हणाली..'मला मारायचे...'

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT