नाशिक

सोने व चांदीचे भाव

CD
चांदीच्‍या भावात ५ हजारांची घसरण --- सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ ः येथील सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १५) चांदीच्या भावात पाच हजार रुपयांची घसरण झाली, तर सोन्‍याचे भाव किरकोळ कमी झाले. बुधवारी सुवर्ण बाजार सुरू झाल्‍यानंतर चांदीचे दर तब्‍बल आठ हजार रुपयांनी खाली. दुपारनंतर मात्र तीन हजार रुपयांची वाढ झाली. चांदीचे भाव मागील दोन दिवसांत ११ हजारांनी कमी झाले आहेत. यंदाच्‍या वर्षात चांदीचे भाव प्रथमच दोन लाख १० हजारांपर्यंत आले आहेत. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरापासून सोने व चांदीचे भाव कमी होत आहेत. गुरुवारी सोने दोनशे रुपयांनी कमी झाले. बुधवारी (ता. १४) सोन्याचा भाव एक लाख ४६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. गुरुवारी सकाळी सोन्‍याचे भाव ५०० रुपयांनी कमी झाले. दुपारपर्यंत तीनशे रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४६ हजार ३०० रुपयांवर आले होते, तर चांदीचे भाव पाच हजार रुपयांनी कमी झाली आहेत. बुधवारी दोन लाख १८ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी गुरुवारी दोन लाख १३ हजार रुपयांपर्यंत खाली आली. काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी) १० ऑक्टोबर---१ लाख ४९ हजार ८००--- २ लाख २५ हजार ११ ऑक्टोबर---१ लाख ४९ हजार ८००--- २ लाख २५ हजार १२ ऑक्टोबर---१ लाख ४८ हजार ५००--- २ लाख २५ हजार १३ ऑक्टोबर---१ लाख ४८ हजार--- २ लाख २४ हजार १४ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १८ हजार १५ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ३००--- २ लाख १३ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT