नाशिक

सुधारित बातमी : सोने बातमी

CD
चांदी दोन हजारांनी महागली --- जळगावला सोन्याचे भाव स्थिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : सुवर्ण बाजारात आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी (ता. १९) सोने- चांदीच्‍या भावात पुन्‍हा वाढ झाली. दसऱ्याच्‍या पूर्वसंध्‍येला सुवर्ण बाजारात भाव वाढले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्‍या दसऱ्याचा सण मंगळवारी (ता. २०) आहे. दसऱ्याच्‍या मुहूर्तावर अनेक जण सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. दरम्‍यान, गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासून सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करण्याची संधी खरेदीदारांना मिळणार आहे. दसऱ्याला भावाचा विचार न करता खरेदीदार सोने व चांदीचे दागिने खरेदी करतात, असे सराफ व्‍यावसायिकांनी सांगितले. सोन्‍याच्‍या आकारातील आपट्याची पाने खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. शनिवारी (ता. १७) सोन्याचा भाव एक लाख ४६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. सोन्याचे भाव मागील तीन दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली आहे. चांदीचे भाव दोन लाख १२ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर होते. त्यात सोमवारी भाव दोन हजार रुपयांनी वाढून चांदी दोन लाख १४ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT