चांदी दोन लाख रुपयांखाली
(उपशीर्षक)
सोन्यात किरकोळ वाढ; खरेदीदारांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ ः गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी चांदीचा भाव अडीच लाखांवर पोहोचला होता. यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली सुरू केली. यामुळे चांदीच्या भावात मागील महिनाभरापासून घसरण होऊन चांदी दोन लाखांखाली आली आहे. सोन्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी सण-उत्सवाच्या काळात कमी झालेल्या भावामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आठवडाभरापासून सोने व चांदीच्या भावात मोठ्या फरकाने घसरण सुरू होती. दोन दिवसांपासून सोने व चांदीचे भाव स्थिरावले होते. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. २६) सुवर्ण बाजार खुला झाल्यानंतर घसरण झाली.
चांदी तीन हजारांनी स्वस्त
मागील आठवड्यात सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. सोमवारी चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण झाली. शनिवारी (ता. २४) सुवर्ण बाजार बंद झाला, त्या वेळी सोने एक लाख ४१ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. त्यात सोमवारी ५०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४२ हजार रुपयांवर आले, तर चांदीचे भाव शनिवारच्या तुलनेत तीन हजारांनी कमी झाले. शनिवारी दोन लाख दोन हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी सोमवारी एक लाख ९९ हजारांपर्यंत खाली आली आहे.
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)
२१ ऑक्टोबर---१ लाख ४४ हजार ५००---२ लाख ११ हजार
२२ ऑक्टोबर---१ लाख ४३ हजार ५००---२ लाख ४ हजार
२३ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार---२ लाख २ हजार
२४ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००---२ लाख २ हजार
२५ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००---२ लाख २ हजार
२६ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार---२ लाख ९९ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.