नाशिक

सिंहस्थ माहितीसाठी अधिकृत माध्यमांचा आधार घ्यावा

CD
सिंहस्थ- कुंभमेळा माहितीसाठी अधिकृत माध्यमांचा आधार घ्या --- कुंभमेळा प्राधिकरणाचे जनतेला आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : सोशल माध्यमावर सिंहस्थाशी संबंधित बनावट हॅन्डलचा पर्दाफाश झाल्यावर कुंभमेळा प्राधिकरण अधिक सतर्क झाले आहे. सिंहस्थ तयारीच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील विकासकामे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि भाविकांसाठी सोयी-सुविधा तसेच अन्य माहितीसाठी अधिकृत सोशल माध्यम हॅडल्सचाच आधार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाबाबत https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिकृत घोषणा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्सही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. नागरिकांना संकेतस्थळावरूनच प्राधिकरणाच्या विविध डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचता येईल. तसेच, सिंहस्थाच्या तयारीबाबतची माहिती, उपक्रम व महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्राधिकरणातर्फे निरनिराळ्या सोशल माध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि सोशल मीडिया हँडल्सला भेट द्यावी. तसेच, समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करूनच ती पुढे प्रसारित करावी, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाची अधिकृत माध्यमे संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in यू ट्यूब : @official_ntkma फेसबुक : @ntkmaofficia एक्स (ट्विटर) : @NTKMA_official; @s_mahakumbh_IND; @s_mahakumbh_MH; @s_mahakumbh-glb इन्स्टाग्राम : @ntkma_official; @simhastha.mahakumbh.ind; @simhastha.mahakumbh.mh; @simhastha.mahakumbh.glb

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Sugars : सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी अखेर फुटली; शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करताच स्वाभिमानीचे आंदोलन पाच दिवस स्थगित

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT