नाशिक

सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा धार्मिक निनाद गुंजणार

CD
लोगो : सिंहस्थ सिंहस्थाच्या पर्वारंभाला धर्मध्वजेचे मंगल तोरण अमृतकुंभ, ॐ, श्री, सिंह, सूर्य-चंद्राच्या शुभचिन्हांनी सजणार भगवा ध्वज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वारंभाचे प्रतीक असलेल्या धर्मध्वजारोहणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाची धर्मध्वजा धार्मिक प्रतीकांसह पारंपरिक कलाकुसरीने सजणार असून, उच्च प्रतीच्या रेशमी धाग्यापासून भगवा ध्वज तयार करण्यात येत आहे. त्यावर अमृतकुंभ, ‘ॐ’, ‘श्री’, सिंह, सूर्य आणि चंद्र अशी मंगलचिन्हे साकारली जाणार आहेत. ३१ ऑक्टोबरला दुपारी १२.०२ वाजता रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे ध्वजारोहणाचा मंगल सोहळा होणार आहे. धर्मध्वजासाठी रेशमी धाग्यासोबत जरीची किनार, नैसर्गिक रंग आणि पारंपरिक कलाकुसरीचा वापर केला जाणार आहे. ध्वजाच्या खाली पितळी घंटा, घुंगरू आणि रेशमी गोंडे लावण्यात येतील. मुख्य धर्मध्वजावर १५ घंटा आणि १२ रेशमी गोंडे, तर श्री गंगा-गोदावरी धर्मध्वजावर नऊ घंटा आणि सहा रेशमी गोंडे असतील. अमृतकुंभातून अमरत्वाचा संदेश धर्मध्वजावरील अमृतकुंभ गोदामातेच्या अमरत्व आणि मुक्तीचे प्रतीक मानला जातो. ‘ॐ’ आणि ‘श्री’ आध्यात्मिक मंगलतेचे द्योतक आहेत. सिंह शौर्याचे तसेच देवगुरू बृहस्पतीच्या वाहनाचे प्रतीक मानला जातो. सूर्य-चंद्र कालचक्राचे प्रतीक असून, सिंहस्थाची अखंड परंपरा पुढे सुरू राहण्याचा संदेश त्यातून दिला जातो. ध्वजारोहणापूर्वी नाशिकची मंगल परिक्रमा मुख्य धर्मध्वजाच्या स्थापनेपूर्वी नाशिक शहराची परिक्रमा करण्याची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. सिंहस्थाच्या पर्वासाठी नाशिककरांना निमंत्रण देण्याचा या परिक्रमेचा आध्यात्मिक हेतू आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजांच्या स्वरूपात तेथील स्वतंत्र धार्मिक परंपरेनुसार वैशिष्ट्यपूर्ण फरक असणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने रामतीर्थ, कुशावर्त आणि नीलपर्वत परिसरात गोदावरी आरती, दीपप्रज्वलन, कुंभगीत आणि शंखनाद असे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २५ ऑक्टोबरच्या कोजागरी पौर्णिमेला ५११ हून अधिक भाविकांच्या सामूहिक शंखनादाचेही नियोजन करण्यात आले आहे. ‘अमृतमंथना’ची अनुभूती देणार ध्वजस्तंभ रामतीर्थावरील मुख्य ध्वजस्तंभ ५१ फूट, तर कुशावर्त आणि नवीन गोदावरी घाटावरील ध्वजस्तंभ ३१ फूट उंचीचे असतील. रामतीर्थावरील ध्वजस्तंभाची संकल्पना ‘अमृतमंथना’वर आधारित असून, त्यावर कमळ, अश्व, हत्ती, रत्ने, कल्पवृक्ष, देवदेवतांची प्रतीके आणि गणपतीची शिल्पे साकारली जाणार आहेत. त्यामुळे ३१ ऑक्टोबरचा धर्मध्वजारोहण सोहळा हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम न राहता धर्मध्वजा, मंगलचिन्हे, शंखनाद आणि गोदावरी आरतीच्या साक्षीने सिंहस्थाच्या पवित्र पर्वाचा औपचारिक शुभारंभ ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT