नाशिक

गोदाघाटावर राष्ट्रपतींच्या हस्ते वीस मिनिटे पुजन

CD
पान एक मेन -------------------- सिंहस्थ कुंभमेळा लोगो वापरणे -------------------- 33657, 33652 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त रामतीर्थ परिसरात व्यासपीठ उभारणीचे सुरु असलेली काम. दुसऱ्या छायाचित्रात रामतीर्थ परिसरात पाहणी करतांना विविध विभागांचे अधिकारी. राष्ट्रपतींच्या हस्ते वीस मिनिटे पुजन रामतीर्थ परिसरात जय्यत तयारी; प्रशासनाची रंगीत तालिम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : सिंहस्थ कुंभमेळा पर्वास शनिवारी (ता.३१) ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. नाशिकमध्ये पंचवटीतील रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.त्यानंतर याठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते वीस मिनिटे पुजा होणार असून त्या गोदाआरतीही करतील. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.२७) यासर्व सोहळ्याची रंगीत तालिम पार पडली. नाशिकच्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करते आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने दौऱ्याचा प्रोटोकॉल ठरविण्यात आला आहे. आगमनापासून ते कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यापर्यंत प्रत्येक मिनिटांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचे सकाळी सव्वाअकराला पंचवटीतील रामतीर्थ येथे आगमन होईल. त्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांच्या हस्ते वीस मिनिटांची पुजा संपन्न होेणार आहे. या पुजेनंतर परिसरातील गंगा गोदावरी मातेच्या मंदिरात त्या दर्शन घेतील. तर दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या सोहळ्यानंतर राष्ट्रपती गंगा गोदावरीची आरती करतील. सोहळ्यासाठी पुजाविधीमधील मंत्रोच्चारापासून ते संबंधित इतर बाबींवर प्रशासनाकडून सुक्ष्म लक्ष दिले जात आहे. --- दोन किलोचे ताम्रपट गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी महावस्त्र आणि ताम्रपट देऊन राष्ट्रपतींचा गौरव केला जाईल. ताम्रपटाचे वजन साधारणत: दोन किलो असून या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे राष्ट्रपती भवनला आवश्‍यक ती माहिती पाठविण्यात आली आहे. --- सनईच्या स्वरांनी स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे रामकुंड परिसरात आगमन झाल्यावर सनईच्या मंजूळ स्वरांनी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पाच वादकांचे पथक हे स्वागत करणार आहे. या पथकात ज्येष्ठ सनई वादकांसह हार्मानियम वादकांचा समावेश असणार आहे. --- सोहळ्याचे यांना निमंत्रण - तिन्ही प्रमुख आखाड्यांचे साधु-महंत - जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार - नाशिक महापालिकेतील सर्व नगरसेवक - प्रमुख धार्मिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ---------------------- स्वतंत्र बातमी लावणे -------------- रामतीर्थ, कुशावर्तावर विशेष टपाल तिकीट ‘माय स्टॅम्प’चे ध्वजारोहण सोहळ्यात अनावरण नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या समृद्ध धार्मिक वारशाची ओळख देशाला व्हावी, सिंहस्थाची आध्यात्मिक परंपरा, धार्मिक महत्त्व आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यासाठी रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ या दोन धार्मिक स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटांची निर्मिती करण्यात आली आहे. टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ उपक्रमांतर्गत तिकिटे साकारण्यात आली असून, ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी तिकीटांचे अनावरण केले जाणार आहे. कुंभमेळ्यात रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ हि दोन महत्वाची धार्मिक केंद्रे आहेत. वैष्णव आणि शैव परंपरांशी निगडित असलेल्या या दोन्ही तीर्थस्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष टपाल तिकिटांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. रामतीर्थ हे वैष्णव संप्रदायाचे पवित्र स्नानस्थळ म्हणून ओळखले जाते. महाकुंभमेळ्यादरम्यान येथे अमृतस्नानाची परंपरा आहे. रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुरचना, तीर्थाचे पावित्र्य आणि सिंहस्थाशी असलेले अतूट नाते विशेष टपाल तिकिटावर चित्रित करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ शैव साधू-संतांच्या पवित्र स्नानाचे प्रमुख केंद्र आहे. या तीर्थाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना आणि पार्श्वभूमीवरील ब्रह्मगिरी पर्वतरांग यांमधून परिसराचे धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व अधोरेखित होते. कुंभमेळा समृद्ध आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. रामतीर्थ आणि कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांच्या माध्यमातून या दोन्ही पवित्र स्थळांचे महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचवता येणार आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्याची परंपरा आणि तीर्थस्थळांचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. - शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT