नाशिक

सिंहस्थ ‘ध्वजारोहणा’वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

CD
पान २ मेन सकाळ विशेष सिंहस्थाचा लोगो वापरावा ....... सिंहस्थ ‘ध्वजारोहणा’वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ तात्पुरते दोन कंट्रोल रुम कार्यान्वित होणार : गोदाघाटावर कडेकोट पोलिस बंदोबस्त .... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३१) दुपारी गोदाघाटावरील रामतीर्थ येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण व सायंकाळी गोदाआरती होणार आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोदाघाटावर शंभर ते दीडशे उच्चप्रतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. याच ठिकाणी दोन कंट्रोल रुमही तात्पुरत्या स्वरुपात उभारले जाणार असून, कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना मिळू शकणार आहे. .... ध्वजारोहणाने कुंभमेळ्याचा प्रारंभ होत आहे. नाशिकचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३१) दुपारी बाराच्या सुमारास तर, त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी रामतीर्थाच्या दोन्ही बाजूने आसनव्यवस्था असेल. देवमामलेदार पटांगणापासून रोकडोबा मैदानापर्यंत नागरिकांसाठी आसनव्यवस्था असेल. यावेळी हजारो भाविक गोदाघाटावर येण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. ..... सीसीटीव्हीचा वॉच राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात असल्याने पोलिस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी दोन कंट्रोल रुमही तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणार आहे. यातील एक कंट्रोल रुम हे लेवा पाटीदार भवन याठिकाणी तर, दुसरे कंट्रोल रुम सरदार चौक पोलिस चौकीत उभारले जाणार आहे. या सीसीटीव्हींच्या माध्यमातून गर्दीतील प्रत्येकांवर नजर ठेवण्यासह गोदाघाटावर येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरही पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास पोलिसांना मदतच होणार आहे. ------------ कोट (फोटो : H33718) सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे ते दोन दिवसात बसविले जातील. सोहळ्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. शुक्रवारपासूनच गोदाघाटावरील रस्ते बॅरिकेटिंग करून बंद केले जातील. - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT