single screen theater
single screen theater esakal
नाशिक

कधी काळची शान असणारे सिंगल स्क्रीन थिएटर काळाच्या पडद्याआड!

युनूस शेख

जुने नाशिक : आधुनिकीकरणामुळे इंटरनेट (Internet), वेब सिरीज (Web series), नवनवीन प्रदर्शित होणारे चित्रपट सर्व काही घरबसल्या उपलब्ध होत आहे. दुसरीकडे जे थोडेफार चित्रपटशौकीन आहेत त्यांच्याकडून मल्टिप्लेक्स थिएटरला (Multiplex theater) पसंती मिळत आहे. त्यामुळे सिंगल थिएटर काळाच्या पडद्याआड इतिहासजमा झाले आहे. (Single screen theater is now on the verge of closing)

बहुतांश चित्रपट स्मार्ट मोबाईलवर उपलब्ध

आधुनिकीकरण आणि धकाधकीच्या जीवनात मनुष्यदेखील यंत्रमानव झाला आहे. दैनंदिन कामातून मनोरंजनासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. दुसरीकडे कार्यालय, घरात, तसेच उद्यानासह अन्य विविध ठिकाणी बसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून नागरिकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. दैनंदिन कामातून वेळ मिळालाच तर अशा वेळेत मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून वेब सिरीज, चित्रपट इतकेच नव्हे तर आवडत्या सिनेतारकांचे चित्रपट स्मार्ट मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने बहुतांशी नागरिकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. काही चित्रपटशौकीन आहेत त्यांना आजही मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यास आनंद येतो. विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणींना. त्यांच्याकडूनदेखील मल्टिप्लेक्स थिएटरला पसंती मिळत आहे.

थिएटर परिसराला यायचे यात्रेचे स्वरूप

कधीकाळी मनोरंजनाचे सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणून असलेल्या सिंगल थिएटरला नागरिकांची मोठी पसंती होती. नवीन चित्रपट आला, की तासनतास रांगेत उभे राहून, तसेच ब्लॅकने तिकीट खरेदी करून चित्रपट पाहिला जाई. थिएटर परिसरास यात्रेचे स्वरूप येत असे. सध्या परिस्थिती आणि मनोरंजनाचे साधन बदलल्याने त्याच सिंगल थिएटरकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. शहर परिसरातील सुमारे दहा सिंगल थिएटर बंद झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्या थिएटरवर उपजीविका करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींनी स्वयंरोजगार सुरू केला, तर काही आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

बराच काळ सिंगल स्क्रीन थिएटरचे राज्य

फार पूर्वी मनोरंजनाचे साधन म्हणून ओपन थिएटर ओळखले जाई. त्या ठिकाणी केवळ चित्रपटच नव्हे तर यात्रोत्सवादरम्यान रामलीला, लावणीचे कार्यक्रम, पोवाडा, नाटके, स्पर्धा होत. हळूहळू त्यात बदल होऊन टीव्ही आणि नंतर ओपन थिएटरची जागा सिंगल बंदिस्त थिएटरने घेतली. बराच काळ सर्वांच्या मनावर सिंगल थिएटरने राज्य केले. सध्या तेही काळाच्या पडद्याआड होत त्यांची जागा इंटरनेट, स्मार्ट मोबाईलने घेतली आहे.

(Single screen theater is now on the verge of closing)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT