नाशिक

विस्ताराला वेग, मूलभूत सुविधांचा अभाव

CD
सिन्नर पान २/मेन वेध प्रभागाचा --------------- प्रभाग क्र. १० (प्रकाशनगर, उद्योगभवन, द्वारकानगर, आश्विनाथनगर, अयोध्यानगर) विस्ताराला वेग, मूलभूत सुविधांचा अभाव ------------------------------------ रस्ते, पाणी, गटारींची समस्या कायम; अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका संपत ढोली । सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ५ : सिन्नर महाविद्यालयापासून ते आश्विनाथ नगरापर्यंत, संजीवनी नगरापासून ते प्रकाशनगर, उद्योगभवन आणि अशोकापर्यंतचा चार किलोमीटरचा परिसर प्रभाग क्रमांक १० मध्ये येतो. प्रभागातील उपनगरे वाढली असली तरी मुलभूत सुविधांपासून ती अजूनही वंचित आहेत. काही उपनगरांत चालण्यासही धड रस्ते नाहीत. तर काही नगरांत पाण्याची सुविधा अपुरी आहे. गटारींचे तर नाव न घेतलेलेच बरे. प्रकाशनगरचा परिसर दोन वर्षापासून चांगलाच विस्तारीत झाला आहे. या उपनगरात पाण्याची सुविधा अजून चांगली नाही. पाणी आले की वीज गायब अशी अनेक वर्षांची समस्या अजूनही काही उपनगरांत सुटलेली नाही. त्यासाठी अजून तीन ट्रान्सफार्मरची गरज आहे. रस्ते आणि गटारी तर झालेल्याच नाहीत. संजीवनीनगर, उद्योगभवन, कर्पेनगर, द्वारकानगर, आश्विनाथनगर, उद्योगभवन, वृंदावननगर या भागात गटारींची कामे बहुतांश अपुरी आहेत. कॉलनी रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या उपनगरांची अवस्था अतिशय वाईट होत असते. उपनगरांचे आरोग्य धोक्यात प्रभागातील या उपनगरांत सध्या डेंगी सदृश आजाराने नागरिक त्रस्त आहेत. पुरेशा पाणी पुरवठ्याचा अभाव असल्याने साठवणुकीच्या पाण्यामुळे डेंगीचा प्रभाव वाढता आहे. सांडपाण्याचीही व्यवस्था चांगली नसल्याने डासांचे प्रमाण जास्त आहे. घंटागाड्या वेळेत येत नाहीत. कचरा संकलन व्यवस्थित नसल्याने नागरिक इतरत्र कचरा फेकून देत असल्याने ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. प्रभागासाठीचे नियोजीत प्रस्ताव - उपनगरांत गटारी, रस्ते काँक्रीटीकरण - तीन ट्रान्सफार्मर नव्याने बसविणे - चार ठिकाणच्या ओपन स्पेसवर नाना-नानी पार्क - कामगार वर्गासाठी कामगार भवनाची निर्मिती -------------- कोट... नगरसेवक काय म्हणतात... विरोधी पक्षातील नगरसेवक असल्याने प्रभागाकडील प्रश्नांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे. कामगार भवन उभारणीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. - अनिल सरवार, नगरसेवक घंटागाड्या, सफाई कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा करत आहे. नवीन उपनगरांत रस्ते, वीजेचे प्रश्न मांडले आहेत. ते होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. - आशा कर्पे, नगरसेवक ---------- नागरिक काय बोलतात... ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा फेकला जातो. असे ब्लॅक स्पॉट आरोग्यासाठी धोकादायक आहेत. नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना गरजेचे आहे. - कुणाल माळी, उद्योगभवन द्वारकानगरात रस्ते चांगले नाहीत. कॉलनी रस्ते अनेक वर्षापासून प्रतिक्षेत आहेत. रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहेत. त्याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे. - विक्रम एखंडे, द्वारकानगर (उद्याच्या अंकात - प्रभाग क्र. ११ - उद्योगभवन, आयोध्यानगर, साईबाबानगर, आश्विनाथ नगर) फोटो क्र. १ ) सिन्नर : कुलकर्णी विद्यालयासमोरील संजीवनी नगरातील सर्वाधिक जुना रस्ता अजून काँक्रीटीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. २) उद्योगभवनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे झालेले काँक्रीटीकरण. ३) अनिल सरवार ४) आशा कर्पे ५) कुणाल माळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

Latest Marathi News Live Update : भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांची कमतरता

धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्याचे विशाखा नक्षत्रात गोचर; तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी कशी असेल स्थिती?  जाणून घ्या राशिभविष्य

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT