नाशिक

नगर परिषदेची शहरात स्वच्छता मोहिम

CD
फोटो चांगला वापरा SNR26B22925 सिन्नर ः नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले पदाधिकारी. ---------------- सिन्नरला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहिम ----------- स्वच्छता दूतांचा सन्मान ः दोन ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२ ः ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या उपक्रमांतर्गत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या अभियानात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. वावी वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेशपेठ, नेहरूचौक, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, बसस्थानक आदी ठिकाणी ही मोहिम पार पडली. दोन ट्रॅक्टर कचरा जमा करण्यात आला. तत्पूर्वी नगरपरिषद कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहर स्वच्छ, हरित व सुंदर राखण्यासाठी उघड्यावर तसेच इतरत्र कचरा न टाकता नगर परिषदेच्या घंटागाडीकडे कचरा द्यावा असे आवाहन नगराध्यक्ष उगले यांनी केले. स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. गटनेते मनोज देशमुख, बांधकाम समिती सभापती उदय गोळेसर, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, आरोग्य सभापती ललिता हांडे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती कांताबाई जाधव, नगरसेवक शुभम वारुंगसे, अजय गोजरे, अमोल झगडे, पंकज जाधव, अशोक जाधव, बाळासाहेब उगले, सुदर्शन नाईक, विलास जाधव, दत्तात्रय हांडे, योगानंद गवळी, अक्षय कानडी, ज्ञानेश्वर उबाळे, सुनील खोळंबे, सुदर्शन बोडके, राजू पवार, नगरसेविका योगिता वरंदळ, सुवर्णा उबाळे, लक्ष्मी पवार यांचेसह शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, नगर अभियंता सौरभ गायकवाड, निवृत्ती चव्हाण आदी उपस्थित होते. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT