नाशिक

शहरातील ब्लँक स्पाँट निश्चित करा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सफाई कर्मचाऱ्यांना सूचना

CD
SNR26B23043 सिन्नर ः नगर परिषदेत ‘सेवाकर्मी संवाद व चहापान कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांना आभा, नमस्ते योजनेचे ओळखपत्र देताना आयुष प्रसाद. समवेत विठ्ठल उगले, अभिजित कदम, ललिता हांडे, पंकज जाधव आदी. ----------------- ३६-४ सिन्नरमधील ब्लॅकस्पॉट निश्चित करा -------- जिल्हाधिकारी ः शहर स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना ------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१० ः शहरातील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना कराव्यात. शहर स्वच्छतेबाबतीत राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांना केली. सिन्नर नगरपरिषद सभागृहात झालेल्या ‘सेवाकर्मी संवाद व चहापान कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजित कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे, तांत्रिक तज्ञ अद्वैत कराळे, नीलेश कर्पे, संपत आव्हाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या तीन वर्षांत शहराला राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे पारितोषिक मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कामातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. नव्याने विकसित झालेल्या उपनगरांमध्येही नियमित स्वच्छता राखण्यासाठी घंटागाडीचे नियोजन करावे. प्रत्येक भागासाठी घंटागाडीची निश्चित वेळ पाळावी, अशा सूचना दिल्या. श्रम साफल्य योजनेतून सफाई कर्मचाऱ्यांना घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. सफाई मित्रांना आयुष्यमान भारत कार्ड, नमस्ते योजना ओळखपत्र, मेडिक्लेम पॉलिसी व आभा कार्डचे वितरण करण्यात आले. गणवेश व वैयक्तिक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. कुटुंबातील महिला सदस्यास साडीचे वाटप करून सन्मानित केले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2026-27: बीडच्या ३ खेळाडूंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड! मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या...

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

एका मृत्यूभोवती गुंफलेलं गूढ, संशयाचं जाळं अन् अनपेक्षित वळणं; अजय पुरकरांचा ‘केस नं. ९९’ येतोय ओटीटीवर

SCROLL FOR NEXT