नाशिक

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला वकिल संघाचा पाठिंबा

CD
पान दोन --------------- 23575 सिन्नर : न्यायालयासमोर दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला सिन्ना वकील संघाचा पाठिंबा सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १८ : येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरु होता. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी न्यायालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाला वकिल संघाने पाठिंबा दिला आहे. वकील संघाचे अध्यक्ष जयसिंग सांगळे, सदस्य ए. एल. गुरुळे, व्ही. बी. गोळेसर, श्रीराम क्षत्रिय, बी. सी. केदार, भाऊशेठ भाटजिरे, गंगावणे, शिवानी जेऊघाले यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. संघाने दिलेल्या पाठिंब्याचे पत्र यावेळी वाचून दाखवण्यात आले. अँड. गोळेसर, अँड. शिवानी जेऊघाले यांनी मनोगत व्यक्त केले. न्यायालयाचे अधीक्षक घनश्याम जाधव, अनिल साबणे, प्रवीण खैरनार, पटेकर, गणेश जाधव, संजय ढिकले, अक्षय राऊत, विनायक पडवळ आदी कर्मचारी आंदोलन सहभागी झाले आहेत. राहुल जाभंळे यांनी वकील संघाचे आभार मानले. ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू झाली असून ही वेतनश्रेणी दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT