नाशिक

सिन्नर सायकलिस्टचे ट्रायथलाँनमध्ये यश

CD
फोटो- 22969 नाशिक ः सिन्नर सायकलिस्टच्या यशस्वी खेळाडूंचा गौरव करताना रवींद्रकुमार सिंगल आदी. सिन्नर सायकलिस्टचे ट्रायथलॉनमध्ये यश सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ७ ः सायखेडा (ता. निफाड) येथे झालेल्या ऑलिंपिक अंतराच्या ट्रायथलॉन व ड्युएथलॉन स्पर्धेत सिन्नर सायकलिस्टच्या खेळाडूंनी यश मिळविले. त्यांनी स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली. ट्रायथलॉनच्या पुरुष गटात डॉ. संदीप मोरे यांनी दीड किलोमीटर जलतरण, ४० किलोमीटर सायकलिंग आणि दहा किलोमीटर धावण्याचे आव्हान पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले. ड्युएथलॉनच्या पुरुष गटात प्रशांत भावसार यांनी पाच किलोमीटर धावणे, ४० किलोमीटर सायकलिंग आणि पुन्हा पाच किलोमीटर धावत प्रथम क्रमांक मिळविला. महिला गटात डॉ. ज्योती मोरे यांनीही ड्युएथलॉनमध्ये पाच किलोमीटर धावणे, ४० किलोमीटर सायकलिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. ट्रायथलॉनमध्ये भास्कर गोजरे, राजेंद्र हांडोरे, सुनील ढाणे, रवी नाईकवाडी, डॉ. सदाशिव लोणारे आणि रवी शिंदे यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. ड्युएथलॉनमध्ये योगेश शिंदे आणि कांचेश पवार यांनी स्पर्धा पूर्ण केली. सिन्नर सायकिलस्टचे माजी अध्यक्ष नितीन जाधव, शिवाजी लोंढे, संदीप ठोक, संतोष कदम, योगेश गडाख, रवी मोगल उपस्थित होते. स्पर्धेत सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. डॉ. मुस्तफा टोपीवाला यांनी आयोजन केले. विजेत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. ..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT