नाशिक

सिन्नरला इंजिनिअरींग क्लस्टरची द्यावे नऊश एकर जागा असल्याने सिमाची जोरदार मागणी

CD
सिन्नरला इंजिनिअरिंग क्लस्टर देण्याची ‘सिमा’ची मागणी सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २७ ः नाशिक-अंबडमध्ये प्रस्तावित इंजिनिअरिंग क्लस्टरवरून औद्योगिक क्षेत्रात प्रश्न उपस्थित होत असून, हे क्लस्टर सिन्नरला उभारावे, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रियल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) ने केली आहे. ही सुविधा अंबड व सातपूर येथे अगोदरच आहे. मात्र सिन्नरमध्ये नसल्याने हे क्लस्टर सिन्नरला व्हावे, अशी मागणी केली आहे. अध्यक्ष सुकुमार नायर, उपाध्यक्ष किरण भंडारी, विठ्ठल जपे, सचिव बबन वाजे, खजिनदार राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मारुती कुलकर्णी, मुकेश देशमुख, सारंग कुलकर्णी, शांताराम दारुंटे, सुधीर जोशी, दत्ता नवले, नवनाथ नागरे, शशिकांत नवले, गणेश तटाने, अतुल अग्रवाल आदींनी केली. माळेगाव टप्पा क्रमांक १ आणि मापारवाडी टप्पा क्रमांक ४ येथे मिळून सुमारे ९०० एकर जागा उपलब्ध असून, तिचे अलॉटमेंट सुरू आहे. असे असताना सिन्नरला डावलून अंबडमध्येच नव्या क्लस्टरचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न ‘सिमा’ने उपस्थित केला आहे. जागा निवडीचे निकष, प्रकल्पाची आवश्यकता आणि अपेक्षित लाभ यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. विद्यमान क्लस्टरची सद्यःस्थिती, वापर आणि उद्योजकांना होणारा लाभ तपासल्याशिवाय नव्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी ‘सिमा’ने केली आहे. विश्वस्त रतन पडवळ यांनी सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असल्याने प्रस्तावित क्लस्टर सिन्नरला द्यावे, अशी मागणी केली. सचिव बबन वाजे यांनीही सिन्नरमधील उद्योजकांना क्लस्टरची आवश्यकता असून, उपलब्ध जागेचा विचार करावा, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT