नाशिक

पाणी पुरवठा जलकुंभ कोसळ्याच्या अवस्थेत एकता नगरातील सांडपाणी पावसाळ्यात नागरिकांच्या घरात

CD
पान तीन मेन --------------- 23347, 23349 सिन्नर : गोंदेश्वर जलकुंभाची झालेली दुरावस्था. दुसऱ्या छायाचित्रात एकता नगरात घराजवळच साचलेले गटारीचे पाणी. प्रभाग क्र. ७ (जोशीवाडी, माकडवाडी, एकतानगर, गौतमनगर, गोंदेश्वर जलकुंभ परिसर) खराब रस्ते, तुटलेली शौचालये, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर मूलभूत सुविधांची वानवा; सांडपाण्याचा गंभीर प्रश्न; जलकुंभ कोसळण्याची भीती संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २ : पंचायत समितीपासून ते गोंदेश्वर स्मशानभूमीपर्यंत आणि नायगाव मार्गापासून ते गोंदेश्वर जलकुंभारापर्यंत (जलकुंभ) प्रभाग क्रमांक सातचा विस्तार पसरलेला आहे. हा संपूर्ण प्रभाग दाट झोपडपट्ट्यांनी व्यापलेला असून, येथील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा गोंदेश्वर जलकुंभ अत्यंत जीर्ण झाल्याने केव्हा कोसळेल आणि शेजारील झोपडपट्टीत एखादी मोठी दुर्घटना घडेल, याचा नेम राहिलेला नाही. तसेच एकतानगरात सांडपाणी साचल्यामुळे संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गोंदेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या जोशीवाडीतील रस्त्यावर २० वर्षापासून दुरुस्त केलेला नाही. एकता नगरातील सांडपाणी वाहून जाण्याची सुविधाच नाही. त्यामुळे मोठ्या खड्ड्यात पाणी साचून पावसाळ्यात बाथरुमधील नळाद्वारे किडे घरात निघतात. त्यामुळे या नगरातील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयांत तुडलेल्या भिंती, भांड्यांमुळे नागरिकांची कुचंबना होत आहे. मातंगवाड्यात पथदीप, रस्त्यांची अवस्था वाईट आहे. खडकपुऱ्यात अनेक मल्ल घडविणारी तालीम दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. प्रभागात अंगणवाडी, अभ्यासिकेची मागणी आहे. जोशीवाडीतील रहिवासी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. ----------- प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव गोंदेश्वर मार्गाचे काँक्रीटीकरण एकतानगरातील गटारींसाठी आउटलेट व्यवस्था सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती गोंदेश्वर जलकुंभासाठी निधीचा प्रस्ताव वीज व्यवस्था भूमिगत, समाजमंदिराची उभारणी धोकादायक बनलेला जलकुंभ गोंदश्वर जलकुंभ अतिशय धोकादायक बनला आहे. केव्हा कोसळून पडेल व जवळच्या झोपडपट्टीत केव्हा अघडीत घटना घडेल याचा नेम राहिलेला नाही. पायऱ्या तुटून पडल्या आहेत. हा जलकुंभ अनेक महिन्यांपासून स्वच्छ केलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या कामांची झाली पूर्तता जोशीवाडी, गौतनगरातील बंदीस्त गटारीचे काम पूर्णत्वास गेले आहे. वैदुवाडीतील संजय धनगर ते शितोळे घरापर्यत बंदीस्त गटार बांधली आहे. प्रभागात गटारींच्या ढाप्यांची दुरुस्तीही पूर्ण केली आहे. एकनात नगरात लक्ष्मीमाता मंदिर अंधारात होते. येथे वीज व्यवस्था पूर्णत्वास गेली आहे. नगरसेवक काय म्हणतात 23351 गोंदेश्वर जलकुंभ यापूर्वीच निर्लेखित केला आहे. त्या जागी नव्याने जलकुंभ उभारण्याची तातडीने गरज आहे. यासाठी अनेकदा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, अद्याप दखल घेतलेली नाही. सागर कोथमिरे, नगरसेवक 23353 रस्ते, भूमिगत वीज व्यवस्था होण्यासाठी पाठपुरावा सुरु असून बंदीस्त गटारींची कामे सुरु आहेत. मुलभूत सुविधा सोडविण्यावर अधिक भर दिला आहे. अंबिका धनगर, नगरसेवक नागरिक काय बोलतात 23355 सर्वच गटारी बंदीस्त स्वरुपाच्या हव्यात, जोशीवाडीतील रस्ता काँक्रीटीकरण करावा. इतर सुविधा बऱ्याचशा पूर्णत्वास गेल्या आहेत. बाबुराव धनगर, रहिवासी, वैदुवाडी 23357 एकता नगरातील लक्ष्मी माता मंदिरात वीज व्यवस्था झाली आहे. नगरातील सर्वात मोठी समस्या गटारीचे पाणी साचून राहण्याबाबत आहे. हे काम मार्गी लागावे. मीना सकट, रहिवासी, एकतानगर ----------- (उद्याच्या अंकात : प्रभाग क्र. ८ – गंगावेस, लालचौक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT