नाशिक

विस्तारलेल्या उपनगरात रस्ते, गटारींचा अभाव मापारवाडी औद्योगिक क्षेत्रामुळे विस्ताराला वेग

CD
पान-१ ॲंकर -------- लोगो--- वेध प्रभागाचा सिन्नर नगरपालिका --------------- प्रभाग क्रमांक १ (भैरवनाथ सोसायटी, त्रिशूळी, मापारवाडी, संभाजीनगर, खर्जेमळा) ------- फोटो SNR26B23182 सिन्नर ः त्रिशूळीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची झालेली दुरावस्था. ----------- SNR26B23184 सिन्नर ः संभाजीनगरात नुकताच झालेला सिमेंटचा रस्ता. -------- लीड पारंपरिक बिडी उद्योगापासून उद्यमशील असलेल्या सिन्नरने १९९० च्या दशकात औद्योगीकरणाचा सुरवात झाल्यापासून कात टाकायला सुरवात केली. तेव्हा टुमदार असलेल्या सिन्नरने गेल्या पस्तीस वर्षात अनेक स्थित्यंतरे पाहिली. सिमेंट कॉंक्रिटच्या इमारतींपासून डांबरी रस्त्यांपर्यंत सिन्नरचे औद्योगिक तसेच शैक्षणिक वाढ वेगाने झाली. सिन्नर आज चहूबाजूने विस्तारले आहे. विस्ताराबरोबरच शहराच्या गरजा आणि जोडीला समस्यांही वाढल्या आहेत. मुलभूत नागरी सुविधांची पायाभरणी होत असताना वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी रस्ते, पाणी, गटारी आणि वीज अशा समस्या आज उपनगरांबरोबरच मूळच्या सिन्नरमध्येही वाढत आहेत. या सर्व बाजूने प्रभागनिहाय घेतलेला वेध आजपासून देत आहोत... ----------- ३६-५ रस्ते कशाला म्हणावे, गटारांचे तर नाव न घेतलेले बरे! ----------- विस्तारणाऱ्या प्रभाग एकला प्रतीक्षा विकासाची, केवळ प्रस्ताव किती दिवस राहणार पडून ----------- संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२६ ः औद्योगिकरणाच्या वाढीने सिन्नर शहराचा आज चहूबाजूने विकास आणि विस्तार होत आहे. उपनगरे वाढत आहेत, लोकसंख्याही वाढत आहे. उद्योगांमुळे रोजगारात वाढ झाल्याने मूळच्या सिन्नर शहरात बहुभाषिकांची संख्याही बऱ्यापैकी वाढली आहे. अनेक जण येथे स्थिरावल्याने नागरी सुविधांच्या निर्मितीवरही ताण वाढत चालला आहे. यातून वीज, पाणी, रस्ते, गटारी या मूलभूत सुविधा पुरविताना पालिकेचीही दमछाक होत आहे. प्रभाग क्रमांक एक हा तसा जुन्या- नवीन उपनगरांचा संगम आहे. होरायझन ॲकडमीपासून ते लोखंडे मळ्यापर्यंत (दक्षिण-उत्तर) आणि बारागावपिंप्री मार्गापासून ते नायगाव मार्गापर्यंत विखुरलेल्या प्रभागाचा वेगाने विस्तार होऊ लागला आहे. मापारवाडी क्षेत्रात औद्योगिक टप्पा क्रमांक चारची घोषणा झाल्यापासून त्यास अधिक वेग आला आहे. उपनगरे जसजशी वाढू लागली आहेत, तसतशा समस्या वाढीस लागल्या आहेत. ---------------- खर्जे, लोखंडे, लहामगे, काळे या मूळच्या येथील वस्त्यांसह मापारवाडी जुनी वस्ती आहे. श्रीकृष्णनगर, भैरवनाथ सोसायटी, संभाजीनगर, गायकवाड मळा, रेणुकानगर, दामोदरनगर ही उपनगरे वेगाने वाढत आहेत. नव्याने वाढत असलेल्या या उपनगरांत रस्ते, गटारींच्या सुविधा मात्र अजून पुरेशा झालेल्या नाहीत. पावसाळ्यात येथील उपनगरात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असते, बऱ्याच भागात अजून पक्के रस्तेही झालेले नाहीत. उपनगरांना जोडणारा मुख्य रस्ता त्रिशूळी- लोखंडे मळ्यापर्यंत जातो. हा रस्ताही खड्ड्यात हरवला आहे. या मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्यास नागरिकांचा बराचसा त्रास कमी होऊ शकेल. गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न रहिवाशांना चांगलाच भेडसावतो आहे. १६-१ ही कामेही झाली चांगली पाणी पुरवठ्याबाबत या प्रभागात फारशी तक्रार नाही. तीन ते चार दिवसांनी पाणी मिळते. पथदीपांची सुविधाही आहे. वीज व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले जाते. संभाजीनगरात सिमेंट काँक्रीटीकरण, श्रीक़ृष्णनगरातील डांबरीकरण ही कामे पूर्णत्वास गेली आहेत. १६-१ प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव - प्रभागात मापारवाडीपर्यंत २४ मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण - उपनगरांतील गटारांसाठी ४०० कोटीचा प्रस्ताव - खर्जे मळ्यात मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण - खर्जे मळ्यातील जुन्या रस्त्यांची खड्डे सुधारणा ---------- (उद्याच्या अंकात - प्रभाग क्रमांक २ - विजयनगर, कानडी मळा, विद्यावर्धिनीनगर) ---------- १६-१ नगरसेवक काय म्हणतात--लोगो कोट फोटोसह बाळासाहेब उगले SNR26B23186 गटारी, रस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिले आहेत. काही भागातील कॉलनी रस्त्यांचेही प्रस्ताव दिले आहेत. ही कामे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. - बाळासाहेब उगले, नगरसेवक ---------- सविता खोळंबे SNR26B23188 रस्ते, गटारींची कामे प्राधान्याने होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या कामांचे प्रस्ताव मंजूर होवून निधीसाठीही प्रयत्न सुरु आहे. खुले भूखंड विकसित करणार आहे. - सविता सुनील खोळंबे, नगरसेविका --------- १६-१ नागरिकांच्या अपेक्षा--लोगो सुनील लहामगे SNR26B23190 नव्याने होत असलेल्या उपनगरांत रस्ते, गटारींची सुविधा प्राधान्याने व्हावी ही आमची अपेक्षा आहे. सध्या सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच सोय नाही. पावसाळ्यात रस्ते म्हणजे अग्निपरीक्षाच असते. ती समस्या दूर व्हावी. - सुनील लहामगे, रहिवासी, लहामगे मळा. ----------- दौलत लोखंडे SNR26B23192 भैरवनाथ सोसायटी ते लोखंडे मळ्यापर्यंतचा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण अथवा डांबरीकरण होणे गरजेचे आहे. हा रस्ता सर्व उपनगरांना जोडला गेला आहे, त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. - दौलत लोखंडे, रहिवासी, लोखंडे मळा ----------------------- --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

Piyush Goyal : समुद्राला बांध घालणाऱ्या डचांसमोर गोयलांनी मांडला 'भारत' नावाचा ब्रँड

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

SCROLL FOR NEXT