MLA Manikrao Kokate, Former MLA Rajabhau Waje, Youth leader Uday Sangle esakal
नाशिक

Sinnar Market Committee Election : वाजे-सांगळे गटाकडून प्रचाराची आघाडी

सकाळ वृत्तसेवा

Sinnar Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या गटात मुख्य लढत होणार असली.

तर भाजपकडून देखील यंदाच्या निवडणुकीत सक्षम पॅनल देण्याची घोषणा करण्यात आल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. वाजे-सांगळे गटाकडून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असून कोकाटे गटात मात्र उमेदवार निश्चितीची खलबते सुरू असल्याने माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. (Sinnar Market Committee Election Vaje Sangle group leads campaign nashik news)

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा, दुसऱ्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक भिन्न असले तरी तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याची संधी या निमित्ताने दोन्ही गटांकडून साधण्यात आली.

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत एका मताने का होईना आमदार कोकाटे गटाने सत्ता हस्तगत केल्यानंतर आता बाजार समितीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याची संधी दोन्ही गटांना आहे. या निवडणुकीच्या यश अपयशावरच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची रणनीती असणार आहे.

बाजार समितीत असणारी सत्ता कायम राखण्यासाठी कोकाटे गटाकडून कोणती व्यूहरचना आखली जाईल हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल. वाजे-सांगळे गटाकडून मात्र त्याबाबत आघाडी घेतली गेली आहे.

आमदार कोकाटे गटाच्या विरोधात भक्कम पॅनल निर्मिती करण्याची तयारी वाजे गटाकडून पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी देखील घेतल्या जात आहेत. विभागस्तरावर मेळावे देखील वाजे गटाकडून घेतले जात आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्या उलट आमदार कोकाटे गटात माघारीपर्यंत कमालीची शांतता दिसून येत आहे. ज्या इच्छुकांना आमदारांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले त्यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात असल्या तरी पॅनलचे चित्र स्पष्ट होत नसल्याने या गाठीभेटींना देखील मर्यादा आली आहे.

भाजपची भूमिका काय?

भाजपकडून उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली खरी, मात्र इच्छुकांची गर्दी वाजे-कोकाटे गटातच दिसली. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये या दोन्ही गटातील इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे भाजपकडून बाजार समितीच्या निवडणुकीत कोणता डाव टाकला जाईल त्यावरच त्यांनी केलेल्या घोषणेला महत्त्व येईल. वाजे-सांगळे गटाकडून प्रचारात घेतली गेलेली आघाडी त्यांच्या गटातील समर्थकांचे मनोबल वाढवणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT