नाशिक

सिन्नरला सावकरीच्या त्रासातून आत्महत्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, संशयितांना अटक

CD
पान-३ मुख्य अंक ----------------------- सिन्नरमध्ये आठ जणांवर सावकारीचा गुन्हा -------------- सात जणांना अटक ः पत्नीच्या फिर्यादीनंतर गुन्हा, एका महिलेचा शोध सुरू ---------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१४ ः येथील रामनगरीतील अतुल रामदास बोऱ्हाडे यांनी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांची पत्नी प्रियांका अतुल बोऱ्हाडे यांनी दिल्याने पोलिसांनी आठ जणांविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संभाजी गिते, नलिनी सचिन गिते, हर्षल गोळेसर, सचिन धनगर, सौरभ खेडलेकर, मीरा खोपे, उज्वला लोखंडे, माधुरी सागर शिंदे (सर्व रा. सिन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत सात जणांना अटक करण्यात आली आहे. नलिनी गिते या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. ------------- अतुल बोऱ्हाडे यांनी बुधवारी (ता.११) आत्महत्या केली होती. ‘संशयितांकडून घेतलेली रक्कम वेळोवेळी परत करूनही फक्त व्याजाची रक्कम मिळाली असून मुद्दल तशीच आहे असे सांगत संशयितांनी घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी केली. मानसिक त्रास दिला व त्या त्रासाला कंटाळून अतुल बोऱ्हाडे यांनी आहे. फोनवर, मेजेसद्वारेही त्रास दिला. पती अतुल यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी बुधवारी (ता.११) आत्महत्या केली’ असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर तपास करत आहेत. शनिवारी (ता.१४) रात्री उशिरापर्यंत नलिनी गिते वगळता उर्वरित सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. नलिनी गिते यांचाही पोलिस शोध घेत होते. सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. येथील व्यावसायिकांना अर्थपुरवठा करून त्याच्या व्याजाचा व्यवसाय फोफावलेला आहे. या अगोदरही एका बड्या सावकारावर कारवाई झाली होती. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT