नाशिक

पुरवठा शाखेचा बोगस लाभार्थ्यांना दणका

CD
पान-१ मेन --------------------- सकाळ विशेष--लोगो --------------- सिन्नरमध्ये साडे पाचहजार कुटुंबांचे रेशन बंद ------------ मिशन सुधार अभियान ः इतर योजनांचे लाभ सुरुच राहणार , बोगस लाभार्थ्यांचा शोध सुरुच ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१३ ः सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी ''मिशन सुधार अभियान'' अंतर्गत तालुक्यात पाच हजार ६२६ कुटुंबाचे रेशन बंद करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी या लाभार्थ्यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. ----------- तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून आधार डेटाबेस आणि शिधापत्रिकांच्या माहितीचा मेळ घालून व्यापक पडताळणी सुरू होती. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदूळ यांसह विविध अन्नधान्याचे वितरण केले जाते. या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाकडून शिधापत्रिकांची तपासणी व पडताळणी करण्यात आली. सरकारने आयकर, प्रशासनाचे विविध विभागाकडून माहिती मागवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर अपात्र कुटुंबांचा लाभ वगळण्यात आला आहे. १६-१ नावे वगळण्याचे १० निकष कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असल्यास, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वाहन असल्यास, उच्च उत्पन्न गटानुसार ग्रामीण भागात वार्षिक दोन लाख तर शहरी भागात तीन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणे, कुटुंबातील कोणीही सदस्य शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत असणे, जिरायती किंवा बागायती जमीन निश्चित मर्यादेपेक्षा जास्त, मृत व्यक्ती, दुबार नावे, नोंदणीकृत व्यवसाय अथवा कंपनी संचालक, सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ धान्य न घेणे, ई-केवायसी न करणे या दहा निकषांवर ही कुटुंबे वगळण्यात आली आहेत. १६-१ खऱ्या लाभार्थ्यांचा शोध तालुक्यात वगळलेल्या पाच हजार ६२६ कुटुंबांची नावे वगळली असली तरी नव्याने तितक्याच खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. नुकत्याच सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानात लाभापासून वंचित असलेल्या आदिवासींना धान्याचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुरवठा विभागाकडून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १६-१ धान्याचा लाभ न घेणारीही कुटुंबे तालुक्यात धान्याचा लाभ न घेणारी सुमारे ७०० कुटुंबे आहेत. लाभात असूनही पाच महिन्यापासून धान्याची उचल या कुटुंबांनी केलेली नव्हती. त्यामुळे त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुरवठा विभागात लाभार्थ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात पारदर्शी येण्यास मदत झाली आहे. ---------------- कोट तालुक्यात मिशन सुधार योजनेंतर्गत कुटुंबे वगळली असली तरी प्रधानमंत्री जनआरोग्य, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य यासाठी या शिधापत्रिका धारकांना लाभ सुरु राहणार आहे. केवळ धान्याचा लाभ बंद झाला आहे. - विवेक जमदाडे, पुरवठा अधिकारी, सिन्नर. -------------

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

पुणे विद्यापाठीत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थींनींनी मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठलं, काय घडलं?

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! ४० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पार, मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट प्रकल्प वेगात; कधी होणार पूर्ण?

SCROLL FOR NEXT