नाशिक

पाच लाखाची तांब्याची तार चोरीस चोरटे सिसिटीव्हीत कैद, चोरीचा छडा लावण्याची मागणी

CD
SNR26B22982 सिन्नर ः चोरी करताना चोरटा. ३०-२ सार्थक इलेक्ट्रीकलमधून २५० किलो तारेची चोरी पाच लाख किंमत ः चोरटा सीसीटीव्हीत कैद --------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.६ ः माळेगाव औद्योगिक वसाहतीतील सार्थक इलेक्ट्रीकलमध्ये मंगळवारी (ता.६) पहाटे साडेतीनच्या सुमारास २५० किलो तांब्याची तार चोरीस गेली आहे. चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेने औद्योगिक वसातीतील कारखानदारांत चिंता व्यक्त केली जात आहे. अक्षय रोडे यांनी घटनेची एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पाच लाखावर किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरट्यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास शटरच्या कड्या तोडून आत प्रवेश मिळविला. लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यात वीजपंप दुरुस्तीसाठी आणलेल्या २५० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरुन नेल्या. याशिवाय १०० किलो तांब्याच्या भंगार ताराही चोरुन नेल्या आहेत. चोरट्यांनी दुचाकीवरुन चारवेळा चकरा मारुन या तांब्याच्या तारा वाहून नेल्या. घटनेने औद्योगिक वसातीतील वीज पंप दुरुस्तीचे काम करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. या अगोदरही माळेगाव औद्योगिक वसाहतीत तीन घटना घडल्या आहेत. यातील एका चोरीतील संशयितांना ताब्याने घेण्यातही पोलिसांना यश आले. तथापि, पुन्हा या व्यावसायिकांना लक्ष्य केले जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT