नाशिक

जीर्ण जलवाहिन्या अन् अनियमित पाणी पुरवठा आयुष्यमान आरोग्य मंदिराने नागरिकांची मात्र घेतली जातेय काळजी

CD
पान दोन ॲंकर वेध प्रभागाचा लोगो वापरणे -------------- प्रभाग क्रमांक ५ (सुतारगल्ली, लोंढे गल्ली, परीट गल्ली, कुंभार गल्ली) ही बातमी मुद्देसूद मांडणीत, शुद्धलेखन तपासून, वाचनीय हेडिंगसह दैनिक सकाळच्या शैलीत करून देणे यात नावे कापू नये. बातमीला योग्य शीर्षक आणि उपशीर्षक देणे 23317 , 23319 सिन्नर : प्रभाग क्रमांक चारमध्ये सुरु झालेली आयुष्यमान आरोग्य सेवा. दुसऱ्या छायाचित्रात लोंढे गल्लीत घराजवळ असलेले वीज तारांचे जाळे. जीर्ण जलवाहिन्या अन् अनियमित पाणीपुरवठा ठिकठिकाणी पसरलेल्या वीज तारांच्या जाळ्याने जीवाला भीती संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३१ : लोंढे गल्ली ते तानाजी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले शाळा असा विस्तार असलेला हा प्रभाग दाट लोकवस्तीचा भाग आहे. मात्र, या प्रभागात पाणीपुरवठ्याच्या वेळा व दिवस निश्चित नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली. प्रभाग पाच हा तसा दाट लोकवस्तीचा प्रभाग. मात्र, अपुऱ्या व अनिश्‍चित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांची तहान देखील पूर्णत: भागत नाही. याठिकाणी कधी तीन दिवसाने तर कधी पाच दिवसाने पाणी मिळते. त्यातच पाणी कोणत्या वेळेला येईल याची श्वाश्वती नागरिकांना नाही. पाणी योजनेच्या समस्येचा फटका येथील पाणी वितरण व्यवस्थेला बसत असल्याने नागरिकांनी पाण्याच्या नियोजनाबाबत खंत व्यक्त केली आहे. अनेकदा पाण्याची वाट पाहत बसावे लागते. दाट लोकवस्तीमुळे नागरिकांकडे साठवण क्षमता अपुरी आहे. त्यामुळे तांत्रिक समस्येमुळे पाणी वितरणात अडथळे आले की प्रभागातील नागरिकांपुढे मोठा प्रश्न उभा राहतो. त्यातच पाणी आल्यावर गायब होणाऱ्या वीज व्यवस्थेसाठी ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्याची गरज आहे. प्रभागात वीज व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. ठिकठिकाणी वीज तारांचे जाळे पसरले आहे. वीज तारा घरांजवळ असल्याने नागरिकांचा जीव कायम जीव मुठीत असतो. वीज तारांचे जाळे हटवून भूमिगत वीज व्यवस्था होण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे. ---------- आरोग्य मंदिरात मोफत सुविधा आयुष्यमान आरोग्य मंदिर नुकतेच सुरु करण्यात आले. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील रोज सरासरी ८० ते ९० रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून शादीखान्यास दीड कोटी तर उर्दू शाळा बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर आहेत. ही कामे झाली मंजूर -अल्पसंख्यांक निधी अंतर्गत तीन कोटी रुपयांची रस्ते काँक्रीटीकरण मंजूर - कुरणे गल्ली ते पडकीवेस, काजीपुऱ्यात अंतर्गत रस्त्यांसाठी निधी - नाशेश्वर परिसर तानाजी चौक ते लोंढे गल्ली काँक्रीटीकरण यासह अनेक रस्ते प्रस्तावित प्रभागासाठी कामांचे नियोजीत प्रस्ताव १) सुतारगल्ली-परीटगल्ली बंदीस्त गटार योजना २) महात्मा फुले विद्यालय परिसर सुशोभीकरण ३) प्रभागात रेन वाँटर हार्वेस्टींग उपक्रम राबविणे ४) प्रभागासाठी प्रशस्त व्यायामशाळा नगरसेवक काय म्हणतात 23321 अल्पसंख्यांक निधीतून काँक्रिटीकरणाची कामे मंजूर असून, ती करताना नवीन जलवाहिन्या गरजेच्या ठिकाणी बंदिस्त गटारी होणार आहेत. वीज व्यवस्था भूमिगत करणार आहे. उदय गोळेसर, नगरसेवक 23323 प्रभागातील सर्वच अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व रस्ते होणार आहेत. पाण्याचाही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. - मनीषा गवळी, नगरसेवक नागरिकांचे म्हणणे 23325 पाणीपुरवठा अनियमित स्वरुपाचा आहे. पंपींग स्टेशनला तांत्रिक समस्या निर्माण झाल्यावर पाणी अनिश्चित वेळेने येते. त्यात सुधारणा व्हावी. - राजेंद्र मिठे, (रहिवासी, लोंढे गल्ली) 23327 किरकोळ बाबी वगळल्या तर सुविधा चांगल्या आहेत. वीज, पथदीप, कचरा संकलन यावर चांगले काम आहे. वीज तारांचे जाळे हटवावे. -गौरव देशपांडे (रहिवासी, सहकार लेन) (उद्याच्या अंकात :प्रभाग क्र. ६, तानाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेशपेठ, लालचौक, गोठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२ व्या आरोपीला बेड्या; हरियाणामधून अटक केलेल्या अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

SCROLL FOR NEXT