नाशिक

नगर परिषदेच्या एक्सप्रेस फिडीरवरील कृषी भार हटवा आमदार कोकाटे यांच्या महावितरणला सूचना

CD
पान-४ मेन फिचर करणे ------------- SNR26B23059 सिन्नर ः नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेतील वीजपुरवठ्याच्या अडथळ्यांची पाहणी करताना विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, अनिल झटकरे, पंकज मोरे, उदय गोळेसर, अमोल देशमुख, पंकज जाधव आदी. --------------- सिन्नरच्या पाणीप्रश्नी कोकाटे आक्रमक ------------- पंपिग स्टेशन वीजपुरवठाप्रश्नी एक्स्प्रेस फिडरवरील कृषीभार तातडीने हटविण्याच्या महावितरणला सूचना सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१२ ः सिन्नर नगरपरिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस फिडरवरील कृषी वाहिन्यांचा भार हटवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. महावितरणला सूचना करताच नगरपरिषद पदाधिकाऱ्यांसह महावितरण अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन तांत्रिक कामांचा आढावा घेतला. याबाबत साकूर फाटा येथे तातडीची बैठक झाली. कोकाटे व्हीडीओ काँन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते मनोज देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, बांधकाम सभापती उदय गोळेसर, नगरसेवक ॲड. पंकज जाधव, अमोल झगडे, शुभम वारुंगसे, सागर कोथमीरे, सुनील खोळंबे, अमोल कासार, लोकेश धनगर, अक्षय कानडी उपस्थित होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांच्यासह संबंधित अधिकारीही यावेळी उपस्थित होते. ---------- खंडीत वीजपुरवठा, उच्च दाबातील चढउतार, थ्रीफेजमधील असंतुलन आदी विषयांवर चर्चा झाली. कृषी फिडरचा विद्युत भार स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरवर वर्ग करणे, कडवा पाणीपुरवठा योजना, एसएमबीटी पंपिंग स्टेशनचा भार व्यवस्थापित करणे, वीज दाब संतुलित ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश कोकाटे यांनी दिले. वीजपुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने त्याचा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. कृषी वाहिन्या व पंपिंग स्टेशन एकाच फीडरवर असल्याने पुरेसा वीज दाब मिळत नाही. त्यामुळे कृषी फिडरचा भार स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरवर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक उपाययोजना करण्याची सूचना केली. १६-१ वीजपुरवठ्यात असंतुलन पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा उपलब्ध झाला तरी व्होल्टेज तिन्ही फेजमध्ये योग्य संतुलन नसल्यास तांत्रिक अडचण होते. वीज दाबातील चढ-उतार आणि असंतुलनामुळे ४५० अश्वशक्तीच्या पंपांवर परिणाम होतो. पंप, स्टार्टर आणि विद्युत नियंत्रण पॅनेलवर अतिरिक्त ताण येत असल्याची बाब अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. १६-१ दोन दिवसात पुन्हा आढावा महावितरणकडून करण्यात आलेल्या बदलांमुळे पंप सुरळीत चालणे, दाब नियंत्रित असणे व इतर अडचणी पुर्णपणे सुटल्याबाबत पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसात त्याची खात्री करण्यात येणार आहे. -----------------

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT