corona update sakal media
नाशिक

Nashik : सिन्नर, निफाड तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट

ही बाब दसरा-दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेसाठी दिलासादायक आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसलेल्या निफाड, सिन्नर व येवला तालुक्यांत आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत शंभराने घट झाली आहे. ही बाब दसरा-दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेसाठी दिलासादायक आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असताना सिन्नर, येवला आणि निफाड या तीन तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट होत नसल्याने जिल्हा यंत्रणेने आठवड्यापासून या तिन्ही तालुक्यांतील कोरोना प्रतिबंध कडक केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तिन्ही तालुक्यांत दौरा करून कोरोना नियंत्रणासाठी आढावा घेतला. गुरुवारी (ता. १४) येवला तालुक्याच्या आढाव्यानंतर ते म्हणाले, की आठवडाभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तिन्ही तालुक्यांतील रुग्णांची संख्या सरासरी शंभराने घटली आहे. आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोरोनासंख्या नियंत्रणात येईल.

निफाडला २८ कारवाया

मांढरे यांनी नगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील गावांना भेटी दिल्या. नांदूरशिंगोटे येथे पाहणी केली. निफाड दौऱ्यात तेथील बेशिस्त दुकानदारांवर कारवाई केल्याचे स्‍थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. वारंवार सूचना देऊनही विनामास्क दुकानात प्रवेश देण्यावरून २८ दुकानदारांना समज देण्यात आली.

दृष्टिक्षेपात...

  • एक सलग ७५ तास लसीकरण

  • प्रतिदिन ५५०० कोरोना टेस्टिंग

  • दिवसाला ५५ हजार लसीकरण

  • २.२५ लाख इंजेक्शन सिरीन प्राप्त

"आठवडाभराच्या प्रयत्नानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. हे समाधानकारक आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. साधारण शंभराने रुग्णांची संख्या आठवडाभरात घटली आहे. आणखी दोन ते तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या तिन्ही तालुक्यांत कमी होईल."

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT