Missing news esakal
नाशिक

Missing Case : शहरातून सहा मुले, मुली बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातून सहा मुले- मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून मुला, मुलींचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (Six boys girls are missing from city Latest Nashik Marathi News Missing Case)

शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलजवळील एका महाविद्यालयातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी बुधवारी (ता.१४) दुपारी साडेबारा वाजता मुलीस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोडले. यानंतर महाविद्यालय संपल्यानंतर मुलगी घरी न परतल्याने त्यांनी सर्वत्र शोध घेतला. गुरुवारी त्यांनी पोलिसांत मुलीचे अपहरण झाल्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

गंजमाळ परिसरातील श्रमिकनगरातून एक मुलगी बेपत्ता आहे. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यावदीवरून भद्रकाली पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. शरणपूर रोडवरील कस्तुरबा नगरातील तरुणीला नात्यातील तरुणाने अपहरण केल्याचा दावा मुलींच्या घरच्यांनी केला. द्वारकाजवळील ट्रॅक्टर हाउस परिसरात एका संस्थेचे खुले निवारागृह आहे.

या निवारागृहातून बारा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. त्याला बाल कल्याण समितीच्या मोहिमेत शोधण्यात आले होते. त्याच्या आई- वडिलांशी संपर्क साधून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणारे होते. परंतु, तत्पूर्वीच हा मुलगा निवारागृहातून पसार झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पवननगरच्या स्वामी समर्थ केंद्रामागील घरातून एका तरुणीला, तर परिसरातून एका तरुणाला पळवून नेल्याच्या तक्रारी कुटुंबांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT