लसीकरण मोहीम  sakal
नाशिक

नाशिक : शहरात दररोज सहा हजार लसीकरण

शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेची तयारी करताना आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचे आव्हान उभे राहिल्याने त्या दृष्टीने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी शहरात प्रतिदिन सहा हजार लसीकरण केले जाणार आहे. विभागनिहाय एक हजार लसीकरण केले जाणार आहे. हर घर दस्तक योजनेंतर्गत पालिकेचे पथक घरोघरी जाणार आहे. आतापर्यंत दहा दिवसात सहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना दुसरी लाट ओसरत असताना आता दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा डेल्टापेक्षा घातक ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. हाय रिस्क यादीत असलेल्या देशांतून नाशिक शहरात आलेल्या नागरिकांचे स्क्रिनिंग वैद्यकीय विभागामार्फत केली जाणार आहे.

कोरोना लक्षणे आढळल्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी महापालिका सतर्क असून, वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. दरम्यान, कोरोना तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणे आवश्‍यक असल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील महापालिकेच्या सहा विभागात दररोज सहा हजार लसीकरणाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. ‘हर घर दस्तक’ योजनेअंतर्गत महापालिकेच्या पथकांमार्फत नागरिकांच्या घरी पोचून लसीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत हर घर दस्तक योजनेंतर्गत मागील दहा दिवसात सहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

दरम्यान, कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये साडेआठ हजार खाटा तयार असून, यातील सहा हजार खाटा ऑक्सिजनयुक्त असल्याची माहिती देण्यात आली.

लसीकरणाची सद्यःस्थिती

  • पहिला डोस घेतलेले - ८,९२,९७०

  • दुसरा डोस घेतलेले - ५,३५,६२५

  • एकूण झालेले डोस - १४ लाख २८ हजार ५९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT