Vangyache bharit esakal
नाशिक

Champa Shashti : चंपाषष्टीच्या पूर्वसंध्येला भरताच्या वांग्यांना ‘भाव’!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मार्कंडभैरवत्थापन अर्थात चंपाषष्टीचे औचित्य साधत खंडेरायाला प्रिय असलेली भरताची वांगी बाजारात दाखल झाली आहे. परंतु आवक कमी असल्याने किलोभर वांग्यासाठी साठ ते ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत. (Sixty to eighty rupees for kilo of brinjal on eve of champa shashti nashik news)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

उद्याच्या चंपाषष्टीसाठी बाजार समितीत जळगाव व एरंडोल येथून दहा बारा टेम्पो भरताची वांगी दाखल झाली आहेत. घाऊक बाजारात या वांग्यांना सरासरी १५ ते २२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला, मात्र किरकोळ बाजारात मात्र किलोभर वांग्यासाठी साठ ते ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत. मंगळवारी (ता. २९) भाव कमी होण्याच्या अपेक्षेने महिलांनी मात्र खरेदीकडे पाठ फिरविल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाला भरत व भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.

ही वांगी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकविली जातात. अलीकडे नाशिक जिल्ह्याच्या काही भागातही या वांग्याच्या पेरणीला पसंती दिली जात असली तरी खवय्यांची पसंती जळगावच्या वांग्यांनाच असते. त्यामुळे रविवार (ता.२७) पासून बाजार समितीत जळगाव व एरंडोल येथून वांग्याची आवक होत आहे. यंदा आवकेत घट झाल्याचे समिती सचिवांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

T20 World Cup विजयानंतर अजित आगरकरची BCCI कडे मोठी मागणी! त्याच्या कार्यकाळात जिंकल्या ३ ICC स्पर्धा, आता म्हणतोय...

SCROLL FOR NEXT