tushar Jagtap esakal
नाशिक

Nashik Crime: चिमुकला कार्यकर्ता ते गुटखा किंग; पोलीस अधीक्षकांनी दिले सखोल तपासाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : माजी पालकमंत्र्यांशी जवळीक, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यपातळीवर राजकीय नेत्यांमध्ये उठबस अन्‌ नाशिक ग्रामीणच्या माजी पोलीस अधीक्षकांच्या विश्‍वासातील असलेला चिमुकला कार्यकर्ता ते थेट गुटखा किंगपर्यंतचा तुषार जगताप याचा प्रवास अंचबित करणारा आहे.

गुटखा तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तुषार जगताप (वय ३६, रा. त्रिमूर्तीनगर, नाशिक) याची जामीनावर सुटका झाली असली, तरी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या गुन्ह्याची पाळेमुळे खणून सखोल तपास करण्याचे आदेशच पथकाला दिले आहेत.

त्यामुळे चिमुकल्या कार्यकर्त्याच्या संपर्कात असलेल्याचे धाबे दणाणले आहे. (Small Worker to Gutkha King tushar jagtap Superintendent of Police ordered thorough investigation Nashik Crime)

इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन कंटेनरमधून सुमारे सव्वा कोटींचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी दोन वर्षांपासून फरारी असलेला राष्ट्रीय पातळीवरचा संशयित गुटखा किंग राज भाटिया याला जयपूरमधून (राजस्थान) अटक केली.

त्यानेच दिलेल्या कबुलीतून नाशिकचा स्वयंघोषित ‘आरोग्यदूत’ तुषारचे नाव समोर आले. त्याच्या मदतीनेच भाटिया हा राज्यात अवैध गुटख्याची तस्करी करीत होता. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी बुधवारी (ता. २८) सकाळी तुषारला नाशिकमधून अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इगतपुरी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, जामीन अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी इगतपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे तपास करीत आहेत.

तर, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सखोल तपासाचे आदेश देतानाच, पाळेमुळे खणून गुटखा तस्करीचे रॅकेट उध्वस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्रामीण पोलीसांच्या या कारवाईमुळे नाशिक शहरातील जगताप याच्या संपर्कातील अनेकजण आणि राज्य पातळीवर राजकीय क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. जगतापच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cafe Illegal Raid : ‘कॅफे’त वाढदिवसाचा नावाखाली नाजूक विषयांना पाठबळ; कोल्हापुरात कॅफेत चटई, उशी, सोफासेट पाहून पोलिसही अचंबीत

Pune Crime : मुळशीत आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसोबत विक्रेत्याचं धक्कादायक कृत्य; गावकऱ्यांचा संताप!

'सनी देओल माझ्या आयुष्यातील काळा अध्याय' प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेत्याबद्दल म्हणाले...'देव सगळं बघतोय, न्याय होईल'

Dhairyasheel Mohite Patil: शिवसेनेसोबत वैचारिक युती; धैर्यशील मोहिते-पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण, प. बंगालमध्ये ९० लाख मतदार गायब!

MP Medha Kulkarni: ‘कॉर्पोरेट जिहाद’वर संसदेत आवाज उठवणार; खासदार मेधा कुलकर्णी यांचा इशारा, तरुणांच्या विचारसरणीवर आक्रमण..

SCROLL FOR NEXT