Smart City Work on ganga ghat reference esakal
नाशिक

अन् आता कामे उरकण्याची लगबग; गंगाघाटावरील कामांची ‘स्मार्ट’ स्थिती

दत्ता जाधव

नाशिक : कोणत्याही परिस्थितीत गोदावरीची पाणीपातळी वाढण्यापूर्वी गंगाघाटावरील स्मार्ट कामे पूर्ण करण्याचा चंग स्मार्टसिटी (Smart City) कंपनीने केला आहे. परंतु, घाईघाईने उरकलेल्या या कामांचा दर्जाही तपासणे गरजेचे आहे. कारण गतवर्षी पहिल्याच पावसात नदीकाठी बसविण्यात आलेल्या अनेक फरशा वाहून गेल्या होत्या. (Smart City Company has completed smart works on Gangaghata before water level of Godavari rises Nashik News)

शहराच्या सर्वच भागात स्मार्टसिटीअंतर्गत भूमिगत गटारांसह रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामे जोरात सुरू आहेत. याशिवाय गंगाघाटाववर नदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. परंतु, ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने स्थानिक व्यावसायिक व वाहनधारक त्रस्त आहेत. रामकुंड परिसरासह सांडव्यावरील देवी मंदिराजवळ त्यामुळे वाहतुकीची कोंडीही अनुभवण्यास मिळत आहे. सध्या कपूरथळा मैदानावर फरशा बसविण्याचे काम सुरू असून, हे काम अक्षरश: उरकले जात असल्याचे दिसून येते.

छत्रीची दुरवस्था

रामकुंड परिसरातील गांधी ज्योतीमागील छत्रीची सध्या दुरवस्था झाली असून, वरील बाजूचे काँक्रिटीकरण पुराच्या पाण्यामुळे वाहन गेले आहे. त्यामुळे छत्रीला बकालपणा आला आहे. स्मार्टसिटीच्या कामाबरोबरच या छत्रीला पुनर्वैभव मिळवून द्यावे, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

वाघाडीत कचरा टाकणे सुरूच

मध्यंतरी महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून वाघाडी नाल्यातील कचरा काढण्यात आला. परंतु, त्यानंतरही वाघाडी नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकणे सुरूच आहे. गोदावरी व वाघाडीच्या संभाव्य पाणी पातळीत वाढ होण्यापूर्वीच हा कचरा काढणे गरेजेचे आहे. अन्यथा पुराच्या पाण्याबरोबरच हा कचरा मोठ्या प्रमाणावर गोदापात्रात वाहून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT