Pimpalgaon Baswant-The library is a bit dry due to lack of regular readers. esakal
नाशिक

Social media Effects : हजारो पुस्तकांचा खजिना; पण वाचक काही फिरकेना!

सकाळ वृत्तसेवा

Social media Effects : पिंपळगांव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना होऊन तब्बल दशकाचा कालावधी उलटला. वाचनालयात नामवंत व नवोदीत लेखकांच्या कथा, कांदबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्रे, नियतकालिके, स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त साहित्य अशा तब्बल ५० हजारहुन अधिक पुस्तकांचा संग्रह आहे.

मात्र, पुस्तकांनी वाचनालये समृद्ध असली, तरी ती वाचनासाठी वाचकांची वाणवा दिसत आहे. मोबाईल व सोशल मिडीयाने वाचनालयांच्या अस्तित्वावरच घाला घातला असल्याने पुस्तक वाचकांची संख्या रोडावली आहे. (Social media effects treasure trove of thousands of books But the readers do not turn around nashik news)

वाचकांप्रेमीची भुक भागविण्यासाठी पिंपळगांव ग्रामपंचायतीने शहरातील उपनगरांमध्ये सात वाचनालये व दोन अभ्यासिका कार्यान्वीत केल्या आहेत. त्यात उंबरखेड रोड, चिंचखेड रोड, शिवाजीनगर, डॉ. आंबेडकरनगर, ग्रामपंचायत भवन येथे वाचनालयाच्या शाखांचा विस्तार झाला.

वेशीजवळील मुख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात २७ हजारहुन अधिक पुस्तकांचा खजिना आहे. तत्कालीन ग्रंथपाल बी. डी. वाटपाडे, आनंदा बनकर यांच्या मनमिळावु व सहकारी वृत्तीमुळे हवे ते पुस्तक सहजतेने उपलब्ध होऊ लागले.

वाटपाडे, बनकर यांनी विविध व्यक्तींचे वाढदिवस, स्मृतीदिनानिमीत्त पुस्तक रूपी देणगीचे संकलन केल्याने वाचनालयात पुस्तकांची श्रृंखला उभी राहीली. राजकीय, सामाजीक, सांस्कृतीक, क्रिडा, धार्मिक, आत्मचरित्र आदी विषयांची पुस्तके वाचनालयात आहेत. वाचनालय अद्ययावत राहावे, म्हणुन ग्रामपंचायतीकडुनही नवनविन पुस्तकांची नेहमीच खरेदी केली जाते.

शिवाय वाचनालयाच्या शाखांमध्ये दहा कर्मचाऱ्यांची नेमणुक करून त्यांच्या वेतनाचा खर्चही ग्राम पंचायतीवर पडतो. मात्र, नियमीत वर्गणीदार वाचकांची संख्या अवघी दीड हजार आहे. वर्तमान पत्रे वाचायला मात्र अजुनही समाधानकारक प्रतिसाद असल्याचे ग्रंथपाल श्‍याम मोरे सांगतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वाचकांना केवळ दहा रूपये अशा अत्यल्प मासिक वर्गणीत मागेल ते पुस्तक उपलब्ध करून देण्याची सुविधा पिंपळगांव ग्रामपंचायतीने केली आहे. परंतु, बदलत्या काळात मोबाईल व सोशल मिडियाने वाचनालयांच्या अस्तित्वावर घाला घातला असुन, वाचकांची संख्या पिंपळगांवच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचकांनी व विद्यार्थ्यांनी पिंपळगांव ग्रामपंचायतीच्या वाचनालयाचे नियमीत वाचक होऊन, वाचन संस्कृती टिकविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ग्रंथपाल भरत बनकर यांनी केले आहे.

"वाचनालयात विविध प्रकारची पुस्तके असुन, गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची, नियमीत वाचकांसाठी विविध लेखकांची वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. नियमीत मासीक वर्गणी फक्त दहा रूपये भरून वाचकांनी लाभ घ्यावा. मागेल ते पुस्तके उपलब्ध करून देण्याची सुविधा वाचनालयात करण्यात आली आहे."

-भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगांव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT