Solar power unit installed at Shahi Masjid.
Solar power unit installed at Shahi Masjid. esakal
नाशिक

Nashik News : सौर ऊर्जेने उजळली शाही मशीद; विजेची 100 टक्के बचत, शहरातील पहिली मशीद

- युनूस शेख

जुने नाशिक : भद्रकाली फुले मार्केट परिसरातील शाही मशीद सौर ऊर्जेच्या ऊर्जेने उजळली आहे. मशिदीमध्ये केवळ सौर ऊर्जेचा वापर केला जात असून १०० टक्के विजेची बचत करणारी शहरातील पहिली मशीद ठरली आहे. (Solar lit Royal Mosque 100 percent electricity saving first mosque in city Nashik Latest Marathi News)

वीज वापरापोटी दर महिन्यास हजारो रुपयांचे बिल वीज वितरण कंपनीस भरणा केला जात होता. महिनाभरापूर्वी शाही मशिदीमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून मशिदीमधील विजेवर चालणारी विविध प्रकारच्या साधनसामग्री ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवली जात आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाकडून पुरवठा होणाऱ्या विजेची सध्या तरी १०० टक्के बचत होत आहे. इतकेच नाही तर आर्थिक बचत देखील होत आहे.

तीच रक्कम मशिदीच्या इतर कामात तसेच, मशिदीमधील मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापर केला जात आहे. मशिदीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणारी शाही मशीद शहरातील पहिली मशीद ठरली आहे. पखाल रोड परिसरातील अहेमद-ए-रजा मशिदीमध्ये देखील सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक असल्याने येत्या काही दिवसात सौरऊर्जेची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

प्रतिदिन ४० युनिट निर्मिती

शाही मशिदीमध्ये १० केव्ही क्षमतेचे युनिट बसविण्यात आले आहे. त्यासाठी २१ पॅनलचा वापर करण्यात आला आहे. थंडीचे दिवस असल्याने सध्या प्रतिदिन ४० युनिट वीज निर्मिती होत आहे. उन्हाळ्यात ५० ते ६० युनिट वीज निर्मिती होण्याची शक्यता तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

सौरचा वापरण्याचा विचार आला पुढे

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मशिदीमध्ये केला जात आहे. त्यात सीसीटीव्ही, वातानुकूलित यंत्र, नमाजची वेळ दर्शविणारे डिजिटल फलक, एलईडी लाइट, आधुनिक साउंड सिस्टिम यांचा समावेश आहे. शिवाय मशिदीमध्ये धार्मिक शिक्षण देणारा मदरसा असल्याने त्याठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही विजेचा वापर केला जात होता. यातूनच सौर ऊर्जा युनिट बसविण्याचा विचार विश्वस्तांच्या बैठकीत पुढे आला.

"सौर ऊर्जा बसविल्यामुळे विजेची बचत होत आहे. बचत झालेली रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसह धार्मिक कामांसाठी वापरता येणार आहे. इतर मशीद, दर्गा यासह अन्य धार्मिक स्थळांनी सौर ऊर्जेचा वापर करावा. त्यातून होणारी आर्थिक बचत गोरगरीब गरजूंसाठी आणि मदरसामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी वापरावी."-अक्रम खतीब, विश्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

SCROLL FOR NEXT