File Photo esakal
नाशिक

NMC News : शहरातील 113 शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल! 1 कोटी 82 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

NMC News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) जाहीर केला आहे. त्याअंतर्गत नाशिक शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल लावले जाणार आहे.

यातून एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्यासाठी महासभेने एक कोटी ८२ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती विद्युत विभागाचे अध्यक्ष अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली. (Solar panels on 113 toilets in city 1 Crore 82 Lakh proposal approved NMC News)

प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) जाहीर केला आहे. त्यात हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे.

विकसनशील नाशिकमध्येदेखील प्रदूषणाची पातळी घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिक शहराचादेखील योजनेत समावेश केला आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला चाळीस कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

या अनुदानातून शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाला प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार एक कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजूर दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या संदर्भातील निविदा प्रक्रियादेखील जाहीर करण्यात आली असून लवकरच पॅनल बसविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली.

"घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाकडे प्रस्ताव देऊन ११३ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसवण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने लवकरच सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार असून, या माध्यमातून हवेचे प्रदूषण कमी होण्याबरोबरच वीजदेखील बचत होईल." - उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

IND vs AUS Semi Final : हिला, झोडायला टीम इंडियाच मिळाली होती! Phoebe Litchfield चा वर्ल्ड रेकॉर्ड अन् दोन भारी विक्रम

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

SCROLL FOR NEXT