पान दोन ॲंकर
----------
10696
सातपूर : निमातर्फे सौर औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञानावर होत असलेल्या विशेष प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी आशिष नाहर, राजेंद्र अहिरे, किशोर राठी, मनीष रावल, मिलिंद राजपूत आदी.
एमएसएमई उद्योगांचा इंधन खर्च घटणार
''निमा''त सौर औष्णिक तंत्रज्ञान प्रशिक्षण; कार्बन उत्सर्जन रोखत ऊर्जा बचतीसाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सातपूर, ता. १३ : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा इंधनावरील खर्च कमी करून ऊर्जा बचत साध्य करणे आणि कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याच्या उद्देशाने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) वतीने सौर औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञानावर दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सातपूर येथील निमा सभागृहात या प्रशिक्षणाचा शुभारंभ ''निमा''चे अध्यक्ष आशिष नहार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना, भारत सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि जागतिक पर्यावरण सुविधा यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषिमाल प्रक्रिया, दुग्धव्यवसाय, मद्यनिर्मिती आणि ओतकाम (फाउंड्री) उद्योगांमध्ये आवश्यक असलेली उष्णता सौर ऊर्जेतून उपलब्ध करून देण्याबाबत या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
व्यासपीठावर ''निमा''चे अध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी व मनीष रावल, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत, जागतिक शाश्वत ऊर्जा उपाययोजना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक द्विपेन बरूआ आणि माहिती तंत्रज्ञान ऊर्जा क्षेत्राचे प्रमुख सल्लागार प्रणबकुमार नाथ उपस्थित होते.
मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले. या प्रसंगी किरण खाबिया, अमित कुलकर्णी, गोविंद बोरसे, जयदीप राजपूत, उदय रकिबे, नानासाहेब देवरे, नकुल बोराडे, अनंत देशमुख, किरण वाणी, गोपाल चांडक, विपुल शंकर आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
उत्पादन खर्चात बचत अन् पर्यावरणाचे रक्षण
कोळसा, डिझेल, एलपीजी आणि इतर पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ''केंद्रित सौर औष्णिक तंत्रज्ञान'' अत्यंत उपयुक्त ठरू शकते. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत, ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियांना चालना मिळू शकते.प्रशिक्षणात तंत्रज्ञानाची उपयुक्तता, प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता, आवश्यक गुंतवणूक, उष्णता साठवण व्यवस्था, संभाव्य बचत आणि गुंतवणुकीवरील परतावा याविषयी माहिती देण्यात आली. तसेच उद्योगांच्या गरजेनुसार प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्याबाबतही उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.