Bhokani : Cupboard broken by thieves here esakal
नाशिक

Nashik News : दिवसा पुन्हा जवानाचे घर फोडले; सिन्नरमध्ये दोन दिवसांतील दुसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

वावी : चोरट्यांनी पुन्हा एकदा लष्करी जवानाचे घर फोडले असून दोन दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे. तालुक्यातील भोकणी येथे शुक्रवारी (ता. २०) दुपारी अज्ञात चोरट्यांनी जवानाच्या बंद घराचे कुलूप तोडून दीड तोळ्याचे सोने व लहान बाळाचे चांदीचे दागिने लंपास केले.

जवान दिनेश दामोदर सानप दिनेश हा केरळ येथे सैन्यदलात कार्यरत असून त्यांचे वडील दामू सानप, आई मंदा सानप, भाऊ पंकज सानप हे भोकणी फाटा येथे घर आहे.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास दामू सानप हे दुपारी झोपेतून उठून गावातील आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात खुरपणीचे काम करत होते. (Soldier house broken into again during day Second incident in two days in Sinnar Nashik News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

यावेळी अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. कपाटातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने व लहान मुलांचे दागिने चोरून पोबारा केला.

यात सात ग्रॅमचे कानातले, दोन ग्रॅमची चैन, दोन ग्रॅमचे ओमपान, तीन ग्रॅमचे कानातले जोड, चांदीचा छल्ला, चांदीच्या पट्या, लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे जोडवे, चांदीच्या तोळबंद्या चोरून फरार झाले. सानप हे घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT