Soldier Ganesh Gite esakal
नाशिक

Soldier Missing : तब्बल 20 तासांच्या शोधकार्यानंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह हाती

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवाना गणेश गिते गुरुवार (ता. 9) रोजी गोदावरी नदीवरील उजवा कालव्यात दुचाकी कोसळली होती. यात हा जवान बेपत्ता झाला होता. एन डी आरच्या पथकाने गुरुवारी सायंकाळपासून शोध सुरू केला होता. तब्बल 20 तासांच्या शोधकार्यानंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह हाती आला आहे. (Soldier Missing body of missing soldier ganesh gite recovered after 20 hours of search by NDRF nashik news)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

गुरुवारी (ता. 9) या दुचाकीवरुन प्रवास करत असतान या जवानाची दुचाकी कालव्यात कोसळली. यावेळी त्याच्यासह पत्नी, मुलगा, मुलीला प्रवास करीत होते. दुचाकी पाण्यात पडल्यानंतर पत्नी, मुलगा, मुलीला वाचविण्यात यश आलेले होते.

मात्र त्यानंतर जवान हा वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. सुमारे 18 ते 20 तास शोधकार्य चालले. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता जवानाचा मृतदेह हाती लागला आहे.

दादा भुसे यांची घटनास्थळी धाव

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक आणि निफाड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा रद्द करून तातडीने सिन्नरला दादा भुसे यांनी धाव घेतली.

शुक्रवारी शोध मोहीम सुरू असताना पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी दुपारी एक वाजता दाखल झाले असता, समस्त पंचकोशीतील गावकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना घेराव घालत सुमारे वीस तास उलटूनही शोध लागत नसल्याचे सांगितले.

आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणाऱ्या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो, जोपर्यंत बेपत्ता जवान सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, सिमंतिनी कोकाटे देखील घटनास्थळी थांबून होते. दिंडोरी आणि निफाड येथील एन डी आर एफ पथक शोधकार्यात सकाळपासून बचाव कार्यात जुंपलेले होते.

प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे, यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित घटनास्थळी हजर होते. तसेच सकाळी 11 वाजेच्या सुमारास कॅनॉलचे आवर्तन बंद करण्यात आलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT