नाशिक

सोनगीरची माहिती एका क्लीकवर

CD
SGR26B07634 सोनगीर : सोनगीरच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार व सहकारी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी. ---------- सोनगीरची माहिती एका क्लीकवर! ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ७ : येथील ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसह गावाची परिपूर्ण माहिती देणारे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) ग्रामपंचायतीने बनवले असून, कार्यालयात न जाता घरबसल्या तक्रारी करता येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगदीश गिंदोडिया, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त संजय सैंदाणे, ग्रामपंचायत प्रशासक एच. डी. महंत, माजी सरपंच लखन ठेलारी, ग्रामपंचायत अधिकारी मेघश्याम बोरसे आदी उपस्थित होते. डिजिटल युगाशी पाऊल मिळवत ग्रामपंचायतीने वेबसाईट तयार केली असून, तिचे डिझाईन करणाऱ्या तंत्रज्ञांनी स्क्रीनवर या वेबसाईटची वैशिष्ट्ये आणि ती कशी वापरावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली. या वेबसाईटच्या माध्यमातून संस्थेचे कार्य, आगामी प्रकल्प, आणि विविध सेवांची माहिती आता एका क्लिकवर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. युजर्सना हाताळण्यास अत्यंत सोपी आणि आकर्षक, अशी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सोनगीर गावाची परिपूर्ण माहिती, लोकसंख्या, गावातील सण, विविध मंदिरे, वैशिष्ट्ये, सुवर्णगिरी किल्ला, नदी, धरणे, शेती, शासन, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या विविध योजना, लोकसंख्या, मजूर संख्या, शेती, पिके, पर्जन्यमान आदी संपूर्ण माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीत आतापर्यंत झालेले सरपंच मावळते सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे फोटो आहेत. संकेतस्थळामुळे सोनगीरची माहिती जगभर पोहचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

IND vs NZ 2nd ODI Live : धो धो पाऊस सुरू झाला... भारताच्या झाल्यात ७ बाद ११३ धावा; सामना आता रद्द झाला तर जिंकणार कोण?

Sakal Lit Fest 2026: ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ नोव्हेंबरपासून;बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT