sonia gandhi and modi.jpg 
नाशिक

वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसी प्रवेश नाकारल्याप्रश्‍नी सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र..म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसींना हक्काचे आरक्षण नाकारले जात असल्याने कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे. 

ओबीसी प्रवेश नाकारल्याप्रश्‍नी सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र 
राज्य, केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणसंस्थांत राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्यातून दिले जाणारे आरक्षण नाकारले जात असून, त्याअनुषंगाने हे पत्र दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अखिल भारतीय कोट्यानुसार 15, 7.5 आणि 10 टक्के जागा अनुक्रमे एससी, एसटी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित आहे, राज्य-केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणसंस्थांत विविध प्रवर्गासाठी वैद्यकीय प्रवेशासाठी हा 
कोटा आरक्षित असताना इतर मागास प्रवर्गातील आरक्षण फक्त केंद्रीय संस्थांपुरतेच मर्यादित आहे. 

अकरा हजार जागा रिक्त 
केंद्र सरकारच्या या कृतीमुळे 2017 पासून 11 हजार ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित ठेवले आहे. अखिल भारतीय ओबीसी फेडरशनने त्या संदर्भात दिलेल्या निवेदनातून ही माहिती पुढे आली आहे. देशात 93 व्या घटनादुरुस्तीत सामाजिक, आर्थिक मागासलेला प्रवर्ग, एससी, एसटी अथवा ओबीसी या प्रवर्गांना राज्य व केंद्रशासित प्रदेशातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता अनुदानित अथवा विनाअनुदानित अथवा खासगी शैक्षणिक संस्थांत प्रवेश देण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोट्यानुसार ओबीसी विद्यार्थ्यांना राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणसंस्थांत प्रवेश नाकारणे हे 93 व्या घटनादुरुस्तीच्या उद्देशालाच हरताळ फासणारे आहे. तसेच हा पात्र ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे, असेही सोनिया गांधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT