HAL.jpg
HAL.jpg 
नाशिक

नाशिककरांनी पुन्हा अनुभवला 'तोच' कानठळ्या बसवणारा आवाज...पण यावेळी कारण?

सकाळवृत्तसेवा

नाशिक : ओझर (सुदर्शन सारडा) २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज कसला हे एक कोडेच होते. जेव्हा या आवाजाचे गूढ उकलले तेव्हा समजले तो आवाज तर...

कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीतपर्यंत

ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये सुपरसॉनिक तंत्रज्ञान विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले. आजूबाजूच्या नागरिकांना एचएएल व्यवस्थापनामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. एचएएल कंपनीमध्ये लढाऊ विमाने तयार केली जातात. त्यामुळे या विमानांची चाचणी परिसरात होत असते. बऱ्याचदा नाशिक शहराच्या वेशीपर्यंत ही विमाने आकाशात घिरट्या घालताना नजरेस पडतात. मंगळवारी यातील एका सुपरसॉनिक विमानाची चाचणी ओझरमधील एचएएलच्या परिसरात पार पडली. यावेळी कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीत ऐकू आला. शहरातही काही भागात हा आवाज ऐकू आला.

कसा होतो आवाज?

एका आवाजाच्या वेगाला एक मॅक असे म्हटले जाते. एका मॅकच्या पुढे आवाजाचा वेग जातो तेव्हा वातावरणाला भेदत असताना त्याचा मोठा आवाज होतो. त्याला सुपरसोनिक बूम असे म्हणतात. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपटहून अधिक असतो. या आवाजाला बऱ्याचदा हायपरसॉनिक म्हणून देखील ओळखले जाते. विमानातून चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचिक माध्यमात प्रेशरवेव्हच्या रूपात प्रवास करीत असतो. हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करते. ४ पाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर म्हणजेच ४,७२४ फूट / से.पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जातात. यापेक्षाही अधिक हा आवाजाचा वेग असतो. त्यामुळे साहजिकच कानठळ्या बसवणारा आवाज होतो. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT