soybean  e sakal
नाशिक

Soybean Rates Fall: दराअभावी पिवळे सोने काळवंडले! सोयाबीनच्या दरात 4 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरण

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : कमी कालवधीत चांगले पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेण्याकडे शेतऱ्यांचा कल वाढला आहे. निफाड तालुक्यात यंदा तब्बल २० हजार हेक्टरवर सोयाबीनचे उत्पादन घेतले.

मात्र, वाढलेला खर्च, पावसाअभावी घटलेले उत्पादन व घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे पिवळे सोने असलेले सोयाबीनचे पीक काळवंडले आहे. सरासरी चार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (Soybean prices fall by Rs 4 thousand per quintal nashik)

सोयाबीनकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहत आहे. सोयाबीनला काढणीला जेमतेम सुरवात झाली असताना, शेतकरी चिंतेत आहेत. पिंपळगावच्या पालखेड मिरचीचे उपबाजार आवारात ३०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

तीन वर्षांपूर्वी नऊ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल उच्चांकी पातळीवर सोयाबीनचे दर गेले होते. दराच्या अपेक्षेने शेतकरी खरिपाबरोबरच उन्हाळ्यातही सोयाबीनचे पीक घेऊ लागले, पण गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर सतत उतरत आहेत. आता ऐन काढणीच्या हंगामात दर चार हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत.

या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. एकरी बारा ते चौदा क्विंटल मिळणारे उत्पादन आता सात ते आठ क्विंटलपर्यंत आले आहे. मागील महिन्यात सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपर्यंत होते.

आता दरात हजार रुपयांनी घसरण होऊन चार हजार रुपयांपर्यंत आले आहेत. केंद्र शासने सोयाबीनची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४ हजार ६०० रुपये घोषित केली आहे, पण सध्याचे दर हमीभावापेक्षा खाली घसरले आहेत. काही शेतकऱ्यांकडे मागील वर्षीचा सोयाबीन शिल्लक आहे.

बंपर पिकांमुळे तेजीची शक्यता मावळली

देशभरात यंदा सव्वाशे लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याच अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यातच जुना सोयाबीनचा २५ लाख टन साठा शिल्लक आहे. सोयाबीनपासून बनविण्यात येणाऱ्या पशुखाद्य ढेपेलाही मागणी नाही.

शिवाय सोयाबीनऐवजी सूर्यफुल तेलाला नागरिक अधिक पसंती देतात. अशा प्रतिकूल स्थितीमुळे सोयाबीच्या दरात तेजी येण्याची शक्यता मावळली असल्याचे व्यापारी मंगेश छाजेड यांनी सांगितले.

सोयाबीनचा एकरी खर्च

-खते, बियाणे : सात हजार रुपये

-आंतरमशागत, औषधे : १३ हजार

-काढणी, मळणी : १० हजार, एकूण खर्च ३० हजार

-सोयाबीनचे मिळणारे उत्पन्न : एकरी ८ क्विंटल

-सरासरी मिळणारा दर : ४ हजार प्रतिक्विंटल, एकूण उत्पन्न : ३२ हजार रुपये

"या वर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे सोयाबीनची पेरणी लांबली. अनियमित पाऊस, प्रतिकूल वातावरणामुळे कींडीचा प्रार्दूभाव झाला. तरीही उत्पादन घेतले. उतरलेले दर पाहता सोयाबीनचे पीक परवडण्यासारखी परिस्थिती नाही. किमान सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहतील."-संजय सुरासे, शेतकरी, पालखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT