soybean-seeds.jpg 
नाशिक

सोयाबीनची बियाणे आठ अन्‌ बाजरीचे 'इतक्या' टक्‍क्‍यांनी महागले!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : खरिपामध्ये बियाणे, खते, कीटकनाशक, पीकसंजीवकांचा काळाबाजार, गैरव्यवहार, लिंकेज आणि कृत्रिम तुटवडा खपवून घेतला जाणार नाही, कारवाई करण्यात येईल, अशी तंबी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. पण शेतीचे खत औद्योगिककरणासाठी विकल्याचा घोटाळा जिल्ह्यात उघडकीस आल्याने या सगळ्या प्रकारांचे कृषी यंत्रणेपुढे आव्हान असेल.

एक लाख क्विंटल बियाणे विक्रीसाठी 

विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हंगामामध्ये सोयाबीनचे सहा लाख क्विंटल महाबीजकडून विक्रीसाठी आणले जाते. यंदा एक लाख क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. गेल्या वर्षी बियाण्यांचे नमुने तपासणीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचा हा परिणाम असल्याचे बियाण्यांच्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीनच्या महाबीजच्या तीस किलो बियाण्याच्या पिशवीची किंमत गेल्या वर्षी एक हजार 890 होती. ती यंदा दोन हजार 250 रुपये इतकी आहे. शिवाय इतर खासगी कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे तीस किलोस दोन हजार 100 रुपयांपर्यंत विकत घ्यावे लागते. मक्‍याच्या किलोच्या बियाण्याचा भाव 294 ते 415 रुपये, असा गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे.

पिकांच्या क्विंटलभर बियाण्यांची किंमत 
 
भाताच्या बियाण्याच्या भावात दोन टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. भाताच्या किलोच्या बियाण्याचा भाव 72 ते 100 रुपये असा आहे. मात्र बाजरीच्या बियाण्याच्या भावात किलोला 30 ते 40 रुपयांनी वाढ होऊन ते 134 ते 433 रुपये या भावाने विकले जात आहे. इतर पिकांच्या क्विंटलभर बियाण्यांची किंमत अशी : 
संकरित ज्वारी- 11 हजार 500 ते 13 हजार रुपये, 
नागली- सहा हजार 500, मूग- 12 ते 13 हजार 500, 
उडीद- 12 हजार 500 ते 14 हजार, तूर- दहा हजार 500 ते 12 हजार 
तसेच कापसामध्ये बीटी कॉटनच्या पॅकेटची किंमत 540 रुपयांपर्यंत सरकारने ठरवून दिली आहे. 

युरियाची वाढली मागणी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधापर्यंत बियाणे आणि खते पोचवण्यात येताहेत. सद्यःस्थितीत युरियाला मागणी वाढली आहे. महिनाभरानंतर कीटकनाशक आणि पीक संजीवकांची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. व्यापारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खतांच्या किमतीत वाढ झालेली नाही. 

जिल्ह्यात बियाण्यांची उपलब्धता 
(आकडे क्विंटलमध्ये) 
बियाणे आवश्‍यकता पुरवठा 

संकरित ज्वारी --- 16 ---112 
संकरित बाजरी --- तीन हजार --- दोन हजार 855 
भात --- 19 हजार 360 --- 18 हजार 546 
मका --- 45 हजार --- 30 हजार 890 
तूर --- 360 --- 590 
मूग --- 406 --- 1 हजार 189 
उडीद --- 428 --- 139 
सोयाबीन --- 22 हजार 650 --- 17 हजार 
बीटी कापूस --- 810 --- 533 
एकूण --- 97 हजार 684 --- 72 हजार 804 

रासायनिक खतांची उपलब्धता 
(आकडे टनामध्ये) खत, मंजूर, उपलब्ध साठा 

युरिया --- 96 हजार --- 43 हजार 295 
डीएपी --- 22 हजार --- 11 हजार 90 
एमओपी --- दहा हजार --- एक हजार 541 
अमोनिअम सल्फेट --- तीन हजार 29 
संमिश्र --- एक लाख 9 हजार --- 41 हजार 463 
एसएसपी --- 16 हजार --- 11 हजार 450 
एकूण --- दोन लाख 58 हजार एक लाख आठ हजार 768 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT