धुळे : टुडे पान २ साठी...
--
जागतिक दिव्यांग दिनी विशेष शिबिराची मागणी
--
पालकत्व प्रमाणपत्रासाठी भाजप दिव्यांग आघाडीचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : राष्ट्रीय न्यास अधिनियम अंतर्गत बौद्धिक दिव्यांगत्व, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी येत्या तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विशेष शिबिर आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष तथा अपंग पुनर्विकास संस्था संघटना जिल्हा अध्यक्ष संजय सरग यांनी मागणी केली. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण समिती आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
-
कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राअभावी दिव्यांग व्यक्तींच्या मालमत्ता, बँक खाती, आरोग्य, शिक्षण व शासकीय योजनांचे निर्णय घेण्यात अडचणी येतात. ग्रामीण भागातील पालकांना अर्ज प्रक्रियेची माहिती नसल्याने आणि अनेक अर्ज प्रलंबित असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे तीन डिसेंबरला जिल्हा व तालुका पातळीवर एकाच छताखाली विशेष शिबिर आयोजित करून अर्ज स्वीकृती, कागदपत्र तपासणी, मार्गदर्शन व प्रशासकीय मान्यता एकाच वेळी द्यावी. तसेच, स्थानिक स्तर समितीमार्फत अधिकारी व वैद्यकीय पथकाची नियुक्ती करावी, ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या माध्यमातून व्यापक पूर्वप्रसिद्धी करावी आणि प्रलंबित अर्जांवर शिबिरातच सुनावणी घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.