NMC News esakal
नाशिक

NMC News : नाशिक महापालिकेकडून अंदाजपत्रक मंजुरीसाठी उद्या विशेष महासभा

आगामी आर्थिक वर्षासाठी २५५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी १६ फेब्रुवारीला विशेष महासभा बोलविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेकडून आगामी आर्थिक वर्षासाठी २५५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी १६ फेब्रुवारीला विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. (Special General Assembly tomorrow for budget approval from Nashik Municipal Corporation nashik news)

लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता घोषित केली जाणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेकडून अंदाजपत्रक मंजूर केले जाणार आहे. अंदाजपत्रकाला ३१ मार्चपूर्वी मंजुरी मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अंदाजपत्रकाचे अंमलबजावणी करता येईल.

मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने १६ फेब्रुवारीला विशेष महासभा बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास २५५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त स्थायी समितीला सादर करतील. स्थायी समितीनंतर महासभेवर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंतर्भाव करून अंदाजपत्रक सादर करतील.

दरम्यान, आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये घर व पाणीपट्टीच्या दरात कुठलीही वाढ होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्टीकरण दोन्ही विभागाकडून देण्यात आले आहे.

त्यामुळे यंदा नागरिकांवर कराचा बोजा राहणार नाही. मात्र, खर्चाची तरतूद करताना आगामी सिंहस्थाचा विचारदेखील करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT