Special Parcel Train for Farmers esakal
नाशिक

Special Parcel Train : शेतकऱ्यांसाठी विशेष पार्सल ट्रेन सुरू; या दिवशी धावणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : किसान ट्रेन काही महिन्यांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे रोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत होते. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने ११ ऑक्टोबरपासून स्पेशल पार्सल ट्रेन सुरू केली आहे. देवळाली कॅम्प ते बिहारदरम्यान धावणाऱ्या स्पेशल पार्सल ट्रेनचे नाशिक रोडला स्वागत करण्यात आले. (Special parcel train started for farmers instead of kisan train Nashik Latest Marathi News)

दर आठवड्याला मंगळवारी आणि शनिवारी ही गाडी धावेल. पार्सल ट्रेन १५ डब्यांची असून, तिला मिळणारा प्रतिसाद पाहून फेऱ्यांचे दिवस वाढविण्यात येणार असल्याचे श्री. मानसपुरे यांनी सांगितले. पार्सल ट्रेनमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे कमी खर्चात शेतीमाल पाठवून मालाला चांगली किंमत मिळविणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. प्रवासी रेल्वेगाड्यांप्रमाणेच ही पार्सल ट्रेन वेळेत व वेगात निर्धारित स्थळी पोचणार आहे.

त्यामुळे गाडीतून माल पाठविणाऱ्या ग्राहकांना चांगली वाहतूक सेवा मिळणार आहे. नवीन पार्सल ट्रेनचा वेग व सेवा चांगली असली तरी यातून माल पाठविण्यासाठी भाड्यात कोणतीही सूट किंवा सरकारचे अनुदान नाही. त्यामुळे पार्सल ट्रेनला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कार्टिंग एजंट कमलेश मोगल, भास्कर नरवडे, रमेश चावला यांनी सांगितले, की पार्सल ट्रेन सकाळी अकराला सुटणार आहे.

नाशिक रोडला माल रात्री येऊन पडणार असल्याने सकाळपर्यंत तो खराब होऊ शकतो. त्यामुळे पार्सल ट्रेन रात्री अकराला सोडावी. किसान ट्रेनला ५० टक्के अनुदान होते. पार्सल ट्रेनमध्ये शेतकऱ्यांना २० ते २५ टक्के अनुदान दिल्यास व गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस चालविल्यास शेतकऱ्यांना न्याय व रेल्वेला मोठा महसूल मिळेल. दिल्ली व कोलकत्यासाठी आठवड्याला तीन गाड्या धावतात.

त्यातील शेती व अन्य सामानाचे डबे मुंबईतच भरतात. त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मालासाठी जागाच राहत नाही. या गाड्यांमध्ये नाशिकसाठी किमान एक डबा राखीव ठेवल्यास व गाडी नाशिक रोडला पाच मिनिटे थांबल्यास शेतकऱ्यांना गॅरंटी मिळून गाडीला प्रतिसाद वाढेल. बंद असलेल्या किसान ट्रेनच्या बोगी प्रवासी गाड्यांना जोडून त्यातूनही शेतमाल पाठवावा.

रोजगार बुडाला

कोळसा वाहतुकीसाठी किसान ट्रेन १३ एप्रिलपासून बंद आहे. ३० हजार जणांचा रोजगार बुडत आहे. लाखो रुपयांचे शेतमालाचे रोज नुकसान होत आहे. नवीन पार्सल ट्रेनमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नाशिक रोडला दहा ते १५ कार्टिंग एजंट (व्यापारी) आहेत. त्या सर्वांकडे मिळून दीडशे मुले कामाला आहेत. पिक-अप, ट्रकचालक- वाहक, प्रत्येक स्थानकावरील हमाल, भाजी विक्रेते, असे हजारो लोक किसान ट्रेनवर अवलंबून आहेत. किसान ट्रेन बंद असल्यामुळे सध्या ५० लोक कामाला आहेत. पार्सल ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला, तर रोजगारही वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT