Alhad Mehlam Burhani Bhaisaheb giving a sermon to the community on the occasion of Ramadan Eid. In the second photo, Rukayya and Abizar Dilawar, sisters and brothers, dressed in traditional attire esakal
नाशिक

Ramzan Eid : देशाच्या सुख, समृद्धीसाठी विशेष प्रार्थना; पारंपरिक उत्साहात बोहरा बांधवांकडून रमझान ईद

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Eid : रमझान महिन्यातील तीस उपवास तारखेनुसार संपल्याने परंपरेनुसार दाऊदी बोहरा मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी (ता. २१) मोठ्या उत्साहात रमझान ईद साजरी केला.

द्वारका येथील कुत्बी मशीद, सरकारवाडा येथील झैनी मशिदीसह इतर ठिकाणी व्यवस्था केलेल्या ठिकाणी रमजान ईदची नमाज पठणासाठी सर्व समाजबांधव पारंपारिक साया, कुर्ता आणि टोपी या वेशभूषेत उपस्थित होते. (Special prayer for happiness prosperity of country Ramadan Eid by Bohra brothers in traditional spirit nashik news)

समाजाचे ५३ वे धर्मगुरू सय्यदना डॉ. आली कद्र मुफद्दल भाईसाहेब यांनी जगभरातील समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. स्वतःचा विकास साधत असताना समाजातील सर्वांना बरोबर घेऊन त्यांचीदेखील प्रगती घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीचे २५ दिवस ते राजस्थान येथील गलियाकोट या ठिकाणी खास रमजान महिन्यानिमित्त उपस्थित होते. ईदच्या सणासाठी ते मुंबईत आल्याने शहरातील असंख्य समाज बांधवांनी त्यांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

द्वारका येथील कुत्बी मशिदीमध्ये अलहद मेहलम बुरहानी भाईसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ईदचे नमाजपठण करण्यात आले. शेख मुस्तफा भाईसाहेब रशीद, शेख मुस्तफा हाफीज, शेख महम्मद आणि शेख अब्बास यांनी विविध कार्यक्रमांचे संयोजन केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तर झैनी मशिदीमध्ये शेख मूर्तझाभाई झाकिर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाजपठण करण्यात आले. परिसरातील सर्व समाजबांधव सहकुटुंब नमाज पठणासाठी उपस्थित होते. देशाची सुख आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी एकमेकाला मिठाई देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. दुपारच्या नमाज पठणानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.

महिनाभर समाजबांधवांसाठी व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक बाबी, शैक्षणिक पर्याय, वैद्यकीय क्षेत्रात होणारे बदल आदींसाठी विशेष चर्चासत्रे घेण्यात आली. समाजाची जमात कमिटी, शबाब आणि तोलोबा या संस्थांनी पवित्र रमजान महिन्यांमधील विविध उपक्रमांचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT