Near Bharveer Junction on Samridadhi Highway Accident damaged vehicle of Ajay Misar. esakal
नाशिक

Nashik News: विशेेष सरकारी वकील मिसर यांच्या वाहनाला अपघात; ताफ्यात वाहन घुसल्याने अपघात, थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील अनेक संवेदनशिल खटल्यांमध्ये सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला बुधवारी (ता. ११) अपघात घडला.

श्रीरामपूरवरून कामकाज आटोपून समृदधी महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना भरवीर फाट्यावर सदरचा अपघात घडला.

ॲड. मिसर यांच्या ताफ्यात बाहेर वाहन घुसल्याने अपघात घडला असून, यात ॲड मिसर यांच्यासह तिघे थोडक्यात बचावले आहेत. (Special Public Prosecutor Misar Vehicle Accident accident narrowly avoided when vehicle plowed into convoy Nashik News)

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सरकारी वकील अजय मिसर हे न्यायालयीन कामकाजानिमित्ताने श्रीरामपूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाला होता.

ॲड. मिसर यांच्याकडे पीएफआयसह अनेक संवेदनशिल खटल्याचे कामकाज पहात असल्याने त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पायलट वाहन आणि एस्कॉर्ट वाहनाच्यामध्ये ॲड. मिसर यांचे सफारी चारचाकी वाहन (एमएच ०१ सीपी १६१८) जात होेते.

समृद्धी महामार्गावरील भरवीर फाट्यानजिक त्यांच्या पायलट वाहन आणि ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या मधे खासगी वाहन घुसल्याने सदरचा अपघात घडला. यावेळी ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

या वाहनात ॲड. मिसर यांच्यासह चालक व त्यांचा सहकारी वकील होते. यात त्यांच्या वाहनाची (एमएच ०१ सीपी १६१८) समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले आहे.

तर, ॲड. मिसर यांच्या खांद्यासह चेहर्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार करून ॲड. मिसर दुसर्या वाहनाने नाशिकला परत येत असल्याची माहिती त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT