नाशिक

धुळ्यात शिक्षकांचा सन्मान

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 33272 धुळे : ‘जिल्हा परिषद’ व ‘दिशा अभियाना’च्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विशेष शिक्षकांचा सन्मान समारंभात शिक्षकांसह मान्यवर. -- बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या दीपस्तंभांचा धुळ्यात सन्मान -- ‘सेवा संकल्प’ अभियानातून ६२ विशेष शिक्षकांचा गौरव; दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याला अक्षरओळख करून देणे, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द जागविणे, हे केवळ शिक्षणाचे काम नसते तर त्यासाठी संयम, संवेदनशीलता आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गरज असते. अशाच भावनेतून बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणेचा प्रकाश पेरणाऱ्या जिल्ह्यातील ६२ विशेष शिक्षकांच्या कार्याचा ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. - जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे आणि दिशा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन २०२६ च्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद पानपाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) स्नेहा पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैभव बाचकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अजय फडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. - क्षमतेला संधी मिळावी मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कि बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आणि आकलनक्षमता वेगळी असते. विशेष शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात. त्यांच्या या योगदानाची समाजाने योग्य दखल घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अजय फडोळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. जी. पावरा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैभव सामोळे यांनी आभार मानले. - १४-१ ..चौकट.. १४-१ गौरव अन् लाभार्थ्यांना मदत या कार्यक्रमात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि अधिनस्त बौद्धिक अक्षमता शाळांमधील विशेष शिक्षक, कंत्राटी शिक्षक, कलाशिक्षक आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह एकूण ६२ जणांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात पाच दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत ४२ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानातून’ संवेदनशील प्रशासनाचा संदेश या वेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे भावनिक साद..!

IND vs NZ 1st T20I : २७ धावांत ४ विकेट्स... संजू सॅमसनचे वादळ दुर्दैविरित्या थांबले अन् टीम इंडियाच्या गटांगळ्या; तिलक, इशान यांनी विश्वास तोडला... Video

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Viral Video: आईच्या कुशीत मस्ती करणारे वाघाचे बछडे; ताडोबाच्या जंगलातील मायेचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

Thyroid Diet Tips: थायरॉईडच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी विचार करा! 'या' पदार्थांबाबत डॉक्टर काय सांगतात?

SCROLL FOR NEXT