Train esakal
नाशिक

Special Train : धुळ्याहून दादरपर्यंत विशेष रेल्वेगाडी

सकाळ वृत्तसेवा

Special Train : महाराष्ट्र दिनापासून धुळ्याहून दादरपर्यंत विशेष रेल्वेगाडी (०१०६५/०१०६६) सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. धुळ्याहून सकाळी साडेसहाला ही गाडी सुटेल.

गाडीचा शुभारंभ शनिवारी (ता.२९) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सकाळी अकरा वाजता गाडीला हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. (Special train from Dhule to Dadar nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ही गाडी शिरूड, जामदा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या ठिकाणी थांबणार आहे. त्यामुळे धुळ्याबरोबरच नाशिक, जळगाव, ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचाही मोठी सोय झाली आहे.

ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी धुळ्याहून सकाळी साडेसहा वाजता सुटेल. ती दुपारी सव्वा वाजता दादरला पोहचेल. रविवार, सोमवार, शुक्रवार या तीन दिवशी ती दादरहून सव्वाचारला सुटेल आणि धुळ्याला रात्री साडेअकराला पोहचेल.

या गाडीला अकरा बोगी आहेत. त्यात एक एसी सीटिंग चेअरची बोगी, आठ विना वातानुकूलित बोगी आणि दोन ब्रेक व्हॅन बोगी असतील. नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशवासीय बांधव नोकरी, व्यवसायानिमित्ताने राहतात. त्यांच्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT