नाशिक

आज, उद्याआज, उद्या मतदार मतदार

CD
जिल्ह्यात आज, उद्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर उद्या (ता.२४) व रविवारी (ता.२५) विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव व तपशिलांमध्ये दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांसह स्थलांतरित किंवा गैरहजर असल्यामुळे नाव सुटलेल्या नागरिकांना या शिबिरांच्या माध्यमातून मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, १ ऑक्टोबरला किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नवमतदारांनाही या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या संबंधित नागरिकांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आवश्यक अर्ज सादर करावेत. मतदार यादीत नाव नोंदविणे किंवा आवश्यक दुरुस्ती करून घेण्यासाठी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT